नुकत्याच झालेल्या एका पाहणीमध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका म्हणजेच सीरमची कोव्हिशिल्ड (Covishield) स्वदेशी कोव्हॅक्सिनपेक्षा (Covaxin) जास्त अँटीबॉडी (Antibody) बनविते, असे समोर आले होते. यावर भारत बायोटेकचे बिझनेस डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल अॅडव्होकेसी हेड डॉ. राचेस एला यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. (Covaxin-maker Bharat Biotech's Raches Ella's post objecting to a study that compares the immune response of the two vaccines used in India)
CoronaVirus: ना वाफ घ्यायचीय, ना कोणती व्हिटॅमिनची गोळी; केंद्राकडून नव्या कोरोना गाईडलाईन जारी
एला यांनी म्हटले की, निरिक्षण केल्या गेलेल्या कामाच्या आधारे निष्कर्ष काढला जात आहे. कोव्हॅक्सिनचे मुल्यांकन करताना स्पाईक आधारित आयजीजी उपयुक्त नाहीय. हा स्पाईक एन आणि एमसाठी मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडी तयार करण्यासाठी प्रेरित करतो.
यासाठी त्यांनी लँसेटच्या एका सल्ल्याचा देखील हवाला दिला आहे. ज्या गोष्टींची चाचणी केली गेली नाही त्या गोष्टींवर प्रसारमाध्यमांचे लक्ष केंद्रीत करण्यापासून वाचण्यास लँसेटने सांगितले आहे. तसेच हे प्रारंभिक निष्कर्ष आहेत, ज्यांचे पुरावे किंवा समीक्षा करण्यात आलेली नाही, असेही सांगण्यास सांगितले आहे.
Corona Vaccination: चिंता वाढली! Covishield चा एक डोस भारतीय व्हेरिअंटविरोधात अपुरा; ब्रिटनचा इशारा
कोरोना व्हायरस लस इंड्यूस्ड अँटीबॉडी टाइट्रे (COVAT) कडून सुरुवातीच्या अभ्यासामध्ये हे निरिक्षण नोंदविण्यात आले होते. यामध्ये ज्या लोकांनी कोव्हिशिल्ड लस टोचून घेतली आहे त्यांच्यात कोव्हॅक्सिनपेक्षा जास्त प्रमाणात अँटीबॉडी तयार होतात, असे म्हटले आहे. या पाहणीमध्ये 552 हेल्थकेअर वर्कर्सना सहभागी करण्यात आले होते.