शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

गोमुत्र पिताय? संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती; जाणून घ्या धोका अन् फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 14:05 IST

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील इज्जतनगरच्या भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थानच्या (IVRI) एका रिसर्चमधून हा खूलासा करण्यात आला

गोमूत्राचे फायदे तुम्ही आतापर्यंत ऐकलेच असतील.  गोमुत्राच्या सेवनानं गंभीर आजारही बरे होतात असंही काही जणांचं म्हणणं असतं. पण देशातील नामवंत संस्था The Indian Council of Agricultural Research (ICAR) आणि इंडियन वेटेरिनरी रिसर्च इंस्टिट्यूटनं एक अभ्यास प्रकाशित केला आहे. ज्यात खुलासा करण्यात आला आहे की गाईच्या मुत्रापेक्षा म्हशीचे मुत्र माणसांसाठी अधिक चांगले असते. 

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील इज्जतनगरच्या भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थानच्या (IVRI) एका रिसर्चमधून हा खूलासा करण्यात आला आहे. या अभ्यासाचे प्रमुख भोजराज सिंह यांनी तीन पीएचड विद्यार्थांनाही यात सहभागी करून घेतले. या संशोधनात असेही समोर आले आहे की निरोगी गायींच्या दुधात किमान 14 प्रकारचे जीवाणू आढळतात. त्यात Escherichia coli ची उपस्थिती देखील आढळते, ज्यामुळे पोटात संसर्ग होण्याचा धोका असतो. हे संपूर्ण संशोधन रिसर्चगेट या ऑनलाइन पोर्टलवर प्रकाशित करण्यात आले आहे.

आयव्हीआरआयच्या एपिडेमियोलॉजी विभागाचे एचओडी भोजराज सिंह यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी विशेष संवाद साधताना सांगितले की, ''या संपूर्ण संशोधनाचा निष्कर्ष काढण्यासाठी आम्ही गाई आणि म्हशींचे 73 मूत्र नमुने गोळा करून सांख्यिकीय संशोधन केले आहे. ज्यामध्ये आम्हाला आढळले की गोमूत्रापेक्षा म्हशीचे मूत्र जास्त फायदेशीर आहे. S Epidermidis आणि E Rhapontici सारखे जीवाणू म्हशीच्या लघवीमध्ये अधिक प्रभावी असतात.''या संपूर्ण संशोधनात अभ्यासकांनी तीन प्रकारच्या गायींचे लघवीचे नमुने गोळा केल्याचे संशोधनात स्पष्टपणे सांगण्यात आले  आहे. या संशोधनात साहिवाल, थारपारकर, विंदवी या प्रजातीच्या गायी होत्या. यासोबतच म्हशी आणि माणसांचे लघवीचे नमुनेही घेतले. गेल्या वर्षी जून ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत तज्ज्ञांनी या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केला. या संपूर्ण संशोधनानंतर या निष्कर्षावर पोहोचले की निरोगी व्यक्तीच्या मूत्रातही धोकादायक जीवाणू असतात.

गाईचे दूध हे जीवाणूविरोधी असते. पण याचा अर्थ आपण गोमूत्र सेवन करावे असा अजिबात नसावा.  संशोधनानुसार मानवांसाठी फारसे चांगले नाही.  गायीच्या प्युरिफाईड युरीनमध्ये अत्यंत घातक बॅक्टेरिया असतात की नाही यावर संशोधन सुरू असल्याचेही भोजराज सिंह यांनी स्पष्ट केले. आयव्हीआरआयचे माजी संचालक आर.एस. चौहान यांनी सांगितले होते की, प्युरिफाईड गोमूत्र कर्करोग आणि कोविडशी लढण्यासाठी प्रभावी आहे.

टॅग्स :cowगायcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारResearchसंशोधन