शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
4
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
5
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
6
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
7
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
8
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
9
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
12
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
13
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
14
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
16
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
17
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
18
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
19
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
20
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा

हिंसाचाराविरोधात माकपा, भाजपा एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:28 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजेश नावाच्या कार्यकर्त्याची २९ जुलै रोजी हत्या झाल्यानंतर दोन पक्षांमधील हिंसाचार रोखण्यासाठी आता माकपा, भाजपा एकत्र येत आहेत.

तिरूवनंतपुरम : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजेश नावाच्या कार्यकर्त्याची २९ जुलै रोजी हत्या झाल्यानंतर दोन पक्षांमधील हिंसाचार रोखण्यासाठी आता माकपा, भाजपा एकत्र येत आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी त्यासाठी ६ आॅगस्ट रोजी तिरूवनंतपुरम येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे.भाजपा, रा. स्व. संघ आणि माकपच्या कार्यकर्त्यांशी संबंधित हिंसक घटनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. भाजपा व संघ नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, शांतता बैठका तिरूवनंतपुरम, कोट्टायम आणि कन्नूर येथे होतील. अलीकडील हिंसाचाराच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे की, सर्व राजकीय पक्षांमध्ये जिल्हानिहाय बैठक व्हायला हवी. कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारात सहभागी होऊ नये, असे स्पष्ट निर्देश या माध्यमातून देण्यात येणार आहेत.मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात मुख्यमंत्री पिनाराई विजयन पत्रकारांना एका खोलीतून बाहेर जायला सांगत आहेत. याच ठिकाणी या बैठकीचे आयोजन होणार होते. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोडियारी बालकृष्णन पत्रकार कधी बाहेर पडतात याची वाट पाहताना दिसत आहेत. विजयन यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कुममानाम राजशेखरन, भाजपाचे एकमेव आमदार ओ. राजगोपाल आणि आरएसएसचे नेते पी. गोपालकुट्टी यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. माकपचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन हेही बैठकीला उपस्थित होते. (वृत्तसंस्था)