सध्या विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये (I.N.D.I.A.) मोठ्या घडामोडी बघायला मिळत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी पक्षांच्या आघाडीतून बाहेर पडल्यानंतर, आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील बाहेर पडण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात CPM ने मोठा दावा केला आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बंगालमध्ये पोहोचली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या या यात्रेत मोठ्या प्रमाणावर डावे कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते. यावेळी सीपीएमचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांच्यासह पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य सुजन चक्रवर्ती आणि इतर काही नेत्यांनी रघुनाथगंज येथे राहुल गांधींची भेट घेतली.
या भेटीनंतर, सलीम म्हणाले, डावा पक्ष आरएसएस-भाजपा आणि अन्याया विरोधातील लढाई लढण्यासाठी काँग्रेसच्या या यात्रेत सभागी झाला आहे. ते म्हणाले आम्ही आरएसएस आणि भाजप विरोधात लढत आहोत. आरएसएस आणि भाजपाचा सामना करण्यासाठी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा घेऊन निघाले आहेत. आम्ही देशातील लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत. आम्ही या यात्रे प्रति ऐक्य दाखविअयासाटी आलो आहोत.’ सलीम आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास 45 मिनिटे ही बैठक चालली.
‘टीएमसी I.N.D.I.A. पासून दूर होण्यास उत्सूक’ -सलीम म्हणाले, ‘TMC ची I.N.D.I.A. तून बाहेर पडण्याची इच्छा आहे. बरेच लोक सुरुवातीपासूनच या आघाडीत सहभागी झाले आहेत. मात्र, भाजपा विरोधातील या लढाईत अखेरपर्यंत कोण राहील आणि कोण यापासून दूर होईल? हे कुणीही सांगू शकत नाही. आता ममता बॅनर्जी यांची यापासू वेगळे होण्याची इच्छा आहे आणि आम्ही याचे स्वागत करतो.’