शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
2
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
4
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
5
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
6
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
7
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
8
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
9
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
10
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
11
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
12
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
13
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
14
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
15
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
16
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
17
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
18
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
19
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
20
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन; दिल्लीत एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 4:14 PM

CPM General Secretary Sitaram Yechury : माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे.

Sitaram Yechury Passed Away : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. सीताराम येचुरी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. येचुरी यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवस डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत होते, मात्र त्यांना वाचवता आले नाही.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, येचुरी यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाला होता. येचुरी यांना १९ ऑगस्ट रोजी दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. न्यूमोनिया आणि छातीत संसर्ग झाल्याच्या तक्रारीनंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. ७२ वर्षीय येचुरी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नंतर आयसीयूमध्ये हलवण्यात आले. मात्र गुरुवारी त्यांची मृत्यूंशी सुरु असलेली झुंज संपली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सीताराम येचुरी यांचा जन्म १९५२ मध्ये चेन्नई येथे तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळात अभियंता होते. आई कल्पकम येचुरी या सरकारी अधिकारी होत्या. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एमएची डिग्री मिळवली. सीताराम येचुरी १९७५ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले. १९७५ मध्ये येचुरी जेएनयूमध्ये शिकत असताना आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली होती. कॉलेजमधूनच ते राजकारणात आले. जेएनयू विद्यार्थी संघटनेचे ते तीन वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रक वाचून येचुरी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर सीताराम येचुरी यांना २०१५ मध्ये प्रकाश करात यांच्यानंतर सीपीएमचे सरचिटणीस बनवण्यात आले. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत हरकिशन सिंग सुरजीत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती.

सीताराम येचुरी यांनी ५० वर्षांपूर्वी विद्यार्थी नेता म्हणून सीपीएममध्ये प्रवेश केला आणि ते सलग तीन वेळा पक्षाचे सरचिटणीस झाले होते. महत्त्वाची बाब म्हणजे २०२१ मध्ये येचुरी यांचा मुलगा आशिष युचेरी यांचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी कोविडमुळे मृत्यू झाला होता. येचुरी यांच्या निधनावर पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी शोक व्यक्त केला आहे. येचुरी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. मी त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो, असे मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 

सीताराम येचुरी यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही शोक व्यक्त केला. "सीताराम येचुरी हे माझे मित्र होते. ते देशाच्या विचारांचे रक्षक आणि देशाची सखोल जाण असलेली व्यक्ती होते. आमच्यात दीर्घकाळ चर्चा व्हायची. या दुःखाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांप्रती माझ्या संवेदना आहेत," असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

टॅग्स :delhiदिल्लीCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया