शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

भिंतीला अन् मनालाही तडे; जोशीमठातील पाडकाम सुरू असलेल्या कुटुंबांना भविष्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 7:35 AM

जोशीमठमधील बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येत आहे, असे उत्तराखंड सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले.

चामोली/हैद्राबाद/नवी दिल्ली : उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये घरे खचल्याने येथे राहणाऱ्या लोकांची झोप उडाली असून, आता पुढे काय हा एकच प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे. येथील लोकांना आपले घर काढून घेतल्याचे दु:ख असून, भविष्याची मोठी चिंता त्यांच्यासमोर आहे. जोशीमठ भागातील केवळ २५ टक्के घरांना भेगा पडल्याचा दावा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केला आहे.

दरम्यान वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) व राष्ट्रीय भू-भौतिक संशोधन संस्थेतील (एनजीआरआय) तज्ज्ञांचे एक पथक उत्तराखंडमधील जोशीमठला रवाना होणार आहे. हे पथक तेथील भूपृष्ठाखालील भागाची शास्त्रीय चाचणी (सबसर्फेस मॅपिंग) करणार आहे.

पुनर्वसन सुरू 

जोशीमठमधील बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येत आहे, असे उत्तराखंड सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. या परिसरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आले असून, पुनर्वसन पॅकेजही तयार केले जात आहे, अशी माहिती मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा व न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाला देण्यात आली. 

कर्णप्रयाग, लंढौरसह अनेक ठिकाणीही संकट

जोशीमठमधील संकटाने अनेक वर्षांपासून भूस्खलनाच्या धोक्याला सामोरे जात असलेल्या उत्तराखंडमधील अन्य शहरांचा मुद्दा ऐरणीवर आला. कर्णप्रयाग व लंढौर या तीर्थक्षेत्रांसह अनेक ठिकाणे या संकटाला तोंड देत आहेत. कर्णप्रयागमधील बहुगुणा नगर येथे २०१५ पासून घरांना भेगा पडत आहेत. गोपेश्वरमधील चमोली जिल्हा मुख्यालयाचा काही भाग व गुप्तकाशीजवळील सेमी गाव अशाच परिस्थितीला तोंड देत आहे. मसुरीतील लंढौर व ऋषिकेशजवळील अटाली गावातही घरांना तडे जात आहेत. सिंगतली, लोडसी, कौडियाळा आणि बावनी या गावांतही घरांना तडे जाण्याचे प्रकार समोर आले आहेत.

संपूर्ण शहर धसण्याची शक्यता

इस्रोने उपग्रहाद्वारे जोशीमठ आपत्तीचा आढावा घेतला. तेव्हा भयावह चित्र समोर आले. उपग्रहाने दाखवलेल्या स्थितीनुसार संपूर्ण जोशीमठ शहर धसू शकते.  उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यात लष्कराचे हेलिपॅड व नरसिंह मंदिर असलेल्या भागाखाली पाणी निचरा प्रणाली (मानवनिर्मित वा नैसर्गिक) असल्याचे समोर आले. पाण्यामुळे तेथील जमीन पोकळ झालेली असू शकते. विशेष म्हणजे याच भागावर शहर वसलेले आहे.

१९ सदस्यीय समिती

प्रत्येक बाधित कुटुंबाला १.५० लाख रुपयांची अंतरिम मदत वाटप व कोणत्या दराने भरपाई द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी बुधवारी चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी हिमांशू खुराना यांच्या अध्यक्षतेखाली १९ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. 

बाधितांना बाजार दराप्रमाणे भरपाई देऊ 

जोशीमठमधील बाधित कुटुंबांना भरपाई देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती बाधितांचे हित लक्षात घेऊन बाजार दर ठरवेल. - पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड