शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला, पण आता..."; शरद पवारांचे मोठं विधान
2
अभिमानास्पद! गडचिरोलीचा बोधी रामटेके संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘ग्रॅज्युएट स्टडी प्राेग्राम’मध्ये!
3
दुर्दैवी! सुरतची लक्झरी बस सापुतारा घाटात कोसळली; दोन जण मृत्यूमुखी, पाच गंभीर जखमी
4
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे सोमवारी सुट्टी; शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा
5
वाहतूक कोंडीमुळे मंत्री, आमदारांचे ‘वंदे भारत’; नाशिक- मुंबई रोडची दुरवस्था
6
लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेतले; इंटरनेट कॅफेच्या चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
7
छत्तीसगडच्या बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुली नागपुरमध्ये ताब्यात
8
कुंडई औद्योगिक वसाहतीत संरक्षक भिंत कोसळल्याने तीन कामगार ठार, एक किरकोळ जखमी
9
'लाडकी बहीण' समितीत तालुका सचिव पदासाठी तहसीलदारांचे हात वर; कामाचा व्याप जास्त
10
मिहान परिसरात कनेक्टिव्हिटी वाढवणे, वाहतूक सुविधा सुधारण्याकरिता १५ जुलैपासून ई-बस सेवा
11
राज्याच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष केंद्रित; विदर्भ, मराठवाड्यात उद्योगांच्या समस्या सोडविणार!
12
RFOच्या डोक्यावर नावालाच राजपत्रित मुकुट; ना पदोन्नती, ना संख्या वाढ!
13
कट, कमिशन व करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू, अनेक भाविक जखमी
15
"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"
16
ZIM vs IND : भारताच्या 'युवा ब्रिगेड'ने पराभवाचा वचपा काढला; झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला
17
"माझे नाव इतिहासात नक्कीच लक्षात ठेवले जाईल"; निरोपाच्या भाषणात ऋषी सुनक यांचे विधान
18
भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
19
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद
20
कोणती अभिनेत्री नाही पण लवकरच लग्नाची बातमी येईल; 'चॅम्पियन' खेळाडू नव्या इनिंगसाठी सज्ज

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 6:54 AM

सर्व कॅबिनेट मंत्र्यांना एकाप्रकारे रोजगार वाढवा, असे थेट सांगण्यात आले असून, खुद्द पंतप्रधान कार्यालयातून सर्व मंत्रालयांच्या सचिवांनाही यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत.

संजय शर्मा

नवी दिल्ली - मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना स्वतंत्रपणे बोलावून रोजगार वाढविण्यासाठी धोरणे बनवण्याच्या सूचना देत आहेत. तिसरी इनिंग सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार वाढविण्याला सर्वांत मोठे प्राधान्य दिले आहे. कॅबिनेटमंत्र्यांना स्वतंत्रपणे बोलावून पंतप्रधान मोदी देशात रोजगार वाढतील अशी धोरणे बनविण्याच्या थेट सूचना देत आहेत.

बुधवारी पंतप्रधानांनी वेगवेगळ्या विषयांवर कॅबिनेट समित्या स्थापन केल्या आहेत, या कॅबिनेट कमिटीमध्ये रोजगार आणि कौशल्य विकासचा समावेश असून, यामध्ये पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, सांस्कृतिकमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, हरदीप सिंग पुरी आणि कामगार-रोजगारमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचाही या समितीमध्ये समावेश आहे.

संरक्षण, रेल्वे, पोस्टात सर्वाधिक संधीपंतप्रधान मोदींचा संपूर्ण भर एका वर्षात ५० लाख नोकऱ्या वाढविण्यावर आहे. यातील सर्वांत जास्त संख्या संरक्षण, रेल्वे आणि पोस्ट आणि तार मंत्रालयाकडून आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाला रोजगार वाढवण्यासाठी संपूर्ण नेटवर्क तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

पीएमओतून सर्व सचिवांनाही सूचनासर्व कॅबिनेट मंत्र्यांना एकाप्रकारे रोजगार वाढवा, असे थेट सांगण्यात आले असून, खुद्द पंतप्रधान कार्यालयातून सर्व मंत्रालयांच्या सचिवांनाही यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. २०२४ चा जनादेश मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि संविधान रद्द करण्याच्या मुद्द्यावर आला आहे हे विशेष आहे.  ४०० पार करण्याचा नारा देणाऱ्या भाजपला यावेळी केवळ २४०वर समाधान मानावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आघाडीचे सरकार चालवत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी