राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेश बदलावर अमूलचे भाष्य..
अभिनेता लिओनार्डो दि कॅप्रिओला अखेर मिळाला ऑस्कर..अमूलनेही केले अभिनंदन
इंग्लंडमधील शाही दाम्पत्य प्रिन्स विल्यम व केट मिडलटन यांच्या भारत दौ-याची अमूलने घेतली दखल..
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून झालेल्या वादावर अमूलची टिप्पणी.
सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या रायचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील जांभळ्या ओठांची खूप खिल्ली उडवली गेली.
महाराष्ट्रासह संपूर्ण देश भीषण दुष्काळात होरपळत असताना "अमूल"नेही त्याची दखल घेतली.
किंगफिशरच्या अस्ताबरोबरच बँकाचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून विजय माल्ल्यानेही देश सोडून पलायन केले. पैसे वसूल करण्यासाठी बँकांनी माल्ल्यांच्या मालमत्तेच्या केलेल्या लिलावालाही प्रतिसाद मिळाला नाही.
तामिळनाडू व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत जयललिता व ममता बॅनर्जी यांना मिळालेल्या अभूतपूर्व यशावर "अमूल"ची टिप्पणी.
कॉमेडियन तन्मय भट्टने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर व्हिडीओतून आक्षेपार्ह शब्दांत केलेली टिप्पणी "अमूल"लाही रुचली नाही.
विख्यात मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांनाही "अमूल"च्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली.
उडता पंजाब चित्रटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर "अमूल"ने "लडता पहलाज" या शीर्षकाखालील कार्टूनच्या माध्यमातून मार्मिक टिप्पणी केली आहे. अमूलची अशीच काही आणखी कार्टून्स तुमच्यासाठी...