शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

क्रिकेटचा दादा प्रशासक हरपला

By admin | Published: September 21, 2015 1:57 AM

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे रविवारी रात्री कोलकातामध्ये निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोलकाता येथे हृदयविकाराचा झटका आला होता

कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे रविवारी रात्री कोलकातामध्ये निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोलकाता येथे हृदयविकाराचा झटका आला होता. या वेळी त्यांना तत्काळ येथील बीएम बिर्ला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. ७५ वर्षीय दालमिया गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. या वर्षीच मार्च महिन्यात त्यांनी बीसीसीआयची धुरा सांभाळली होती. विशेष म्हणजे सुमारे १० वर्षांनंतर भारतीय क्रिकेटमध्ये जबरदस्त पुनरागमन करताना ते बिनविरोधपणे अध्यक्षपदी निवडून आले होते. दरम्यान, प्रकृती ठीक नसल्याने या वेळी बीसीसीआयमध्ये त्यांचा फारसा सक्रिय सहभाग दिसून आला नाही.भारतीय क्रिकेटमध्ये व्यावसायिकता आणतानाच त्यांच्या प्रयत्नांमुळे क्रिकेटमध्ये पैशांचा ओघ सुरू झाला. दालमिया यांच्या निधनाबाबत माहिती देताना रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले, की अंतर्गत रक्तप्रवाह व शरीराने काम करणे बंद केल्याने दालमियांचे निधन झाले. तर, बंगाल क्रिकेट संघाच्या (कॅब) सूत्रांनी सांगितले, की रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रकृती बिघडली आणि यानंतर लगेच दालमिया यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर ते सावरू शकले नाही.दालमिया अनेक दिवसांपासून आजारी होते. मार्चमध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही त्यांना बीसीसीआयच्या दैनंदिनी कामकाजामध्ये सहभागी होता येत नव्हते. सततच्या आजारपणामुळे गेल्या काही आठवड्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर आणि आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला सोमवारी कोलकाता येथे पोहोचतील. (वृत्तसंस्था)क्रिकेटची ताकद लॉर्ड्सपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सपर्यंत पोहचवणाऱ्या जगमोहन दालमिया यांनी बीसीसीआयला आत्मनिर्भर संस्था म्हणून पुढे आणले आणि हीच संस्था आज ‘सोन्याची कोंबडी’ म्हणून ओळखली जाते. मैदानाबाहेरच्या खेळपट्टीवर या ‘स्टार फलंदाजा’ने सुखद, दु:खद आणि सोनेरी दिवसही पाहिले. त्यांनी भारतीय क्रिकेटला सर्वात मोठी भेट दिली ती म्हणजे १९९० मध्ये. वर्ल्ड टेलसोबत लाखो डॉलरचा करार करीतत्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला जगात सर्वात श्रीमंत स्थानी पोहचवले. इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या दोन देशांची सत्ता ज्या क्रिकेट खेळावर होती. त्यातील भारतातील संधी ओळखून हा खेळ जगमोहन दालमिया यांनी भारतात फ्रन्टफुटवर आणला. केवळ पैसाच नव्हे तर क्रिकेट जगताला भारत ही काय चीज आहे हे ही दाखवून दिले. आज भारताचे क्रिकेट विश्वात जे खेळाडू आणि खेळामुळे नाव आहे ते व्यवस्थापन आणि प्रशासन या पातळीवरही दालमिया यांनी उंचावण्याचे काम केले. ३५ वर्षांची त्यांची प्रशासनातील कारकीर्द भारतीय क्रिकेट विश्वाला नव्या उंचीवर घेवून गेली. राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी व्यक्त केला शोकनवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. क्रिकेट जगत रविवारी रात्री शोकसागरात बुडाल्याच्या वृत्तानंतर राष्ट्रपतींनी टिष्ट्वट केले, ‘‘जगमोहन दालमिया यांच्या निधनावर शोक व्यक्त करतो.’’ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दालमिया यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले, ‘‘संकटाच्या वेळी जगमोहन दालमिया यांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर दालमिया यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.’’सचिन तेंडुलकर : त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि पाठिंबा आमच्या नेहमीच स्मरणात राहील. त्यांनी क्रिकेटसाठी खूप कष्ट केले. प्रशासक म्हणून त्यांचे काम उत्तम होते.अनिल कुंबळे : दालमियांच्या निधनाने दुख: झाले. त्यांचे भारतीय आणि जागतिक क्रिकेटमध्ये मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने मोठे नुकसान झाले आहे. ते नेहमीच खेळाडूंच्या बाजूने होते.व्ही. व्ही. एस. लक्ष्मण : भारतीय क्रिकेटसाठीचे त्यांचे योगदान मोठे होते. त्यांची दृष्टी विशाल होती ते उत्तम प्रशासक होतेबिशनसिंह बेदी : दालमिया एक मुत्सद्दी प्रशासक होते. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून त्यांचे काम मोठे होते.संजय मांजरेकर : ते प्रशासक असले तरी क्रिकेट त्यांच्या हृदयात होते.रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनीही दालमिया यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनावर बीसीसीआयने व्यक्त केला शोकनवी दिल्ली : अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनावर बीसीसीआयने शोक व्यक्त केला. क्रिकेट जगताला या अनुभवी प्रशासकाची उणीव भासेल, अशा शब्दांत बीसीसीआयने शोक व्यक्त केला. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘बीसीसीआयच्या सर्व सदस्यांच्या वतीने दालमिया यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती दु:ख व्यक्त करतो. भारतीय क्रिकेटमध्ये पितृतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या दालमिया यांनी क्रिकेटच्या विकासासाठी कार्य केले. क्रिकेटजगताला त्यांची उणीव भासेल. दालमिया यांनी भारतीय क्रिकेटला विश्वपातळीवर नावलौकिक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यातील हुशार प्रशासकाने भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून देण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहणार आहे. भारतीय क्रिकेटला त्यांनी दिलेल्या योगदानाची बरोबरी केली जाऊ शकत नाही.’’क्रीडा प्रशासकांमध्ये दालमिया यांचा दर्जा मोठा : ममता बॅनर्जीकोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना क्रीडा प्रशासकांमध्ये त्यांचा दर्जा मोठा असल्याचे म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांनी टिष्ट्वट केले, ‘जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्याचे वृत्त दु:खद आहे. क्रीडा प्रशासकांमध्ये त्यांचा दर्जा मोठा होता. बंगालवर प्रेम असलेले ते चांगले व्यक्ती होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.’’दालमिया यांचा अल्प परिचय : जन्म : ३० मे १९४०, कोलकाता, मारवाडी परिवारशिक्षण : स्कॉटीश चर्च कॉलेज युनिव्हर्सिटी आॅफ कोलकातापत्नी : चंद्रलेखा, एक- मुलगा, एक- मुलगी आंतरमहाविद्यालयीन, क्लब क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक व फलंदाज वडिलांना व्यवसायात मदतीसाठी २० व्या वर्षी योगदानकंपनीचे नाव : एमएल दालमिया कंपनी, १९७९ : बीसीसीआयमध्ये सर्वात तरुण सदस्य म्हणून प्रवेश १९८० : कोषाध्यक्ष म्हणून निवड. रिलायन्स चषक स्पर्धेतील अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आणण्यासाठी दालमिया यांनी एन.के.पी. साळवे यांची समजूत काढली. १९८३ : बीसीसीआय खजिनदारपदी निवड याच काळात भारताने विश्वचषक जिंकला. १९९० : मध्ये दालमिया व इंद्रजितसिंग बिंद्रा या दोघांनी क्रिकेट या ‘जंटलमन्स गेम’मध्ये व्यावसायिकता आणली. त्यांच्याच प्रयत्नामुळे क्रिकेटमध्ये पैशाचा ओघ सुरू झाला. १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत आॅस्ट्रेलियाच्या माल्कम ग्रे याच्या विरुद्ध त्यांना २३-१३ अशी मते पडली; पण आयसीसीच्या नियमावलीनुसार त्यांना दोनतृतीयांश संख्याबळ आवश्यक होते. हे संख्याबळ पार करता आले नाही. त्यानंतर त्यांच्यावर १९९६ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गैरव्यवहार केल्याचा आरोप लावण्यात आला. १९९७ : आयसीसी चेअरमनपदी सर्वानुमते निवड, पुढील तीन वर्षे पदाची धुरा सांभाळली.२००१ मध्ये एसी मुथय्या यांचा पराभव करीत अध्यक्ष बनले. त्यानंतर आपला उमेदवार रणबीर सिंग महेंद्रा यांना आपले निर्णायक मत देत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्गज नेते शरद पवार यांचा पराभव निश्चित केला. २००६ मध्ये दालमिया यांना निलंबित करण्यात आले. क्रिकेट असोसिएशन आॅफ बंगालवरूनही पायउतार व्हावे लागले. न्यायालयीन लढाईनंतर त्यांनी राज्य क्रिकेटमध्ये पुन्हा स्थान मिळवले. २०१३ मध्ये दालमिया यांची बीसीसीआयच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाली. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या एन. श्रीनिवासन यांना हटविल्यानंतर दालमिया यांना ही संधी मिळाली. तब्बल दहा वर्षांच्या कालखंडानंतर ते अध्यक्षपदावर विराजमान झाले होते.