खुशालचंद बाहेतीबंगळुरू : क्रिकेटची मॅच फिक्सिंग फसवणूक होत नाही. जर एखादा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये गुंतला असेल, तर खेळप्रेमींची त्याने फसवणूक केली अशी प्रेक्षकांमध्ये सर्वसाधारण भावना निर्माण होईल. परंतु, ही भावना ४२० आयपीसीचा गुन्हा होत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीनिवास हरीश कुमार यांनी म्हटले आहे.
नोव्हेंबर २०१९ मध्ये दुसर्या एका प्रकरणात चौकशीदरम्यान गुन्हे शाखा बेंगळुरूला ऑगस्ट २०१९ मध्ये खेळण्यात आलेल्या कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये खेळाडूंनी मॅच फिक्सिंग केल्याची माहिती मिळाली. यावर अबरार काझी, २ खेळाडू आणि एका फ्रँचायझी मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला. पोलिसांनी कलम ४२० (फसवणूक) आणि कलम १२० (ब) (षड्यंत्र) आयपीसी अंतर्गत आरोपपत्र दाखल केल्यानंतर, अबरार काझी आणि इतरांनी आरोपपत्र रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.
फिर्यादी पक्षाचे मुद्दे : सामना पाहण्यासाठी लोक तिकीट खरेदी करतात. ते एक निष्पक्ष खेळ पाहतील अशी त्यांच्या मनात अपेक्षा असते. मॅच फिक्सिंग झाल्यास, निकाल पूर्वनिर्धारित असतो आणि कोणताही निष्पक्ष खेळ होत नाही. त्यामुळे लोकांची फसवणूक होते.
उच्च न्यायालयाचे मत :१. ४२० आयपीसीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी, आवश्यक आवश्यक आहे फसवणूक व कोणत्याही संपत्तीच्या विनियोगासाठी अप्रामाणिक प्रलोभन.२. पैसा ही संपत्ती आहे; पण दर्शकांना तिकीट खरेदी करण्यास प्रवृत्त केले जाते हा युक्तिवाद मान्य करता येणार नाही.३. दर्शकांना असे वाटत असेल की ते निष्पक्ष खेळ पाहतील; परंतु ते स्वेच्छेने तिकिटे खरेदी करतात. त्यामुळे तिकीट खरेदीसाठी प्रलोभनाचा प्रश्नच येत नाही.
४. मॅच फिक्सिंग हा खेळाडूंचा अप्रामाणिकपणा, अनुशासनहीनता आणि मानसिक भ्रष्टाचार दर्शवते . ५. यासाठी शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचा अधिकार बीसीसीआयला आहे.६. बीसीसीआयच्या उपविधींमध्ये खेळाडूंविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद असल्यास, अशा कारवाईला परवानगी आहे परंतु या साठी ४२० अंतर्गत एफआयआर नोंदवता येणार नाही.
७. कर्नाटक पोलीस कायद्याचे कलम २(७) स्पष्टपणे सांगते की संधीच्या खेळामध्ये कोणताही ऍथलेटिक खेळ किंवा खेळ समाविष्ट नाही. क्रिकेट हा एक खेळ आहे आणि त्यामुळे बेटिंग जरी होत असली तरी कर्नाटक पोलीस कायद्यातील 'गेमिंग'च्या व्याख्येत तो बसु शकत नाही.( सीआरएल. पी. नं. २९२९/२०२०)
बचाव पक्षाचा युक्तिवाद :मॅच फिक्सिंगमध्ये खेळाडूंचा सहभाग आहे असे गृहीत धरले तरी तो ४२० आयपीसी अंतर्गत फसवणूक केल्याचा गुन्हा ठरणार नाही.फारतर हा बीसीसीआयने खेळाडूंना दिलेल्या आचारसंहितेचा भंग आहे. यात बीसीसीआयकडून कारवाई होऊ शकते.