प्रियंका गांधींचा 'राजकीय षटकार', क्रिकेट मॅचचा व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 08:29 AM2019-09-14T08:29:29+5:302019-09-14T08:40:46+5:30

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

With a Cricket Video, Priyanka Gandhi Tweets Advice for BJP Ministers Over 'Ola-Uber' Theory | प्रियंका गांधींचा 'राजकीय षटकार', क्रिकेट मॅचचा व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल

प्रियंका गांधींचा 'राजकीय षटकार', क्रिकेट मॅचचा व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल

Next
ठळक मुद्देकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.क्रिकेट मॅचमधील कॅचचा व्हिडिओ पोस्ट करुन मोदी सरकारवर टीका केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जनहितार्थ जारी असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. क्रिकेट मॅचमधील कॅचचा व्हिडिओ पोस्ट करुन मोदी सरकारवर टीका केली आहे. 'क्रिकेट या खेळात जेव्हा कॅच पकडायचा असतो तेव्हा चेंडूवर नजर आणि खेळ खेळण्याची भावना मनात असणं गरजेचं आहे. कॅच सुटला म्हणून गुरुत्वाकर्षण, गणित आणि ओला-उबर अशी कारणं द्यायची नसतात' असं म्हणत प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केला आहे. यासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जनहितार्थ जारी असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

प्रियंका गांधी यांनी याआधीही मोदी सरकारच्या वाईट कामगिरीमुळे देशात आर्थिक मंदी आली आहे अशी टीका केली होती. तसेच ऐतिहासिक स्वरुपाची मंदी आल्याचे सरकारने कबुल करावे असेही त्यांनी म्हटले होते. देशात मंदी आल्याचे व तिचा सामना करण्यासाठी सरकार उपाययोजना करत असल्याचे प्रत्येक जण पाहतो आहे. मात्र तरीही मोदी सरकार खरी वस्तुस्थिती सांगण्यास तयार नाही. प्रसारमाध्यमांद्वारे खोटे चित्र रंगवून सरकारला सत्य फार काळ झाकता येणार नाही. शेकडो वेळा खोटे बोलले की ती गोष्ट कालांतराने लोकांना खरी वाटायला लागते असे प्रत्येक वेळेस होत नाही. जून महिन्याअखेर संपलेल्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकासदर 5 टक्क्यांपर्यंत खाली घसरला. या दरात गेल्या सहा वर्षांत इतकी घसरण कधीही झाली नव्हती. देशामधील वाहननिर्मिती क्षेत्राला मंदीचा मोठा फटका बसला असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं होतं. 

प्रियंका गांधी यांनी यापूर्वी 'देशात मंदी आहे की नाही हे सरकार स्वीकारणार आहे का? अर्थमंत्र्यांनी राजकारणाशिवाय आपल्या अर्थव्यवस्थेचं सत्य देशातील जनतेला सांगायला हवं. जर हेच सत्य अर्थमंत्री स्वीकारायला तयार नसतील तर सर्वात मोठी समस्येचं निरसन कसं करणार? असा सवाल केला होता. तसेच 31 ऑगस्ट रोजी प्रियंका गांधी यांनी सरकारवर टीका करताना अच्छे दिनचा भोंगा वाजविणाऱ्या भाजपाने अर्थव्यवस्थेची हाल बिघडवून टाकले आहेत. जीडीपी दराने आता हे स्पष्ट झालं आहे, देशातील लोकांचे रोजगार गेले आहेत. अर्थव्यवस्था नष्ट करण्यामागे कोण जबाबदार आहे? हा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला होता. 

 

Web Title: With a Cricket Video, Priyanka Gandhi Tweets Advice for BJP Ministers Over 'Ola-Uber' Theory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.