नवी दिल्ली : ओडिशात रेल्वेअपघाताची काल घडलेली घटना म्हणजे एक वाईट स्वप्नच. कालच्या दुर्दैवी घटनेनं कुणाच्या पोटचा लेक गेला, कोण अनाथ झालं तर कुणाचा आधार गेला. ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली, त्यानंतर हावडा एक्सप्रेसनेही जोरदार धडक दिली. या ३ ट्रेनच्या अपघाताचे भयावह फोटो आता समोर येत आहेत. सर्वच स्तरातून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे शिलेदार यांनी देखील या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
त्यामुळे मृतदेहांची काय अवस्था झाली असेल याचा अंदाजही लावणे कठीण आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. अशातच पश्चिम बंगालमधील मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. पाहता पाहता मृतांचा आकडा आता २०७ वरून २८८ वर पोहचला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ट्विटच्या माध्यमातून मृतांना श्रद्धांजली वाहिली.
ओडिशात झालेल्या रेल्वे दुर्घटनेने मोठा धक्का बसला - लोकेश राहुल
जखमींनी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना - विराट कोहली
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने देखील या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.
मिताली राज भावुक
"बालासोर रेल्वे अपघातातील दृश्ये खरोखरच हृदय पिळवटून टाकणारी आहेत", असं भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजनं म्हटलं.
ओडिशातून आलेली हृदयद्रावक बातमी - इरफान पठाण
भारतातील अत्यंत दुर्दैवी घटना - शोएब अख्तर, पाकिस्तानचा माजी खेळाडू
तरूणाईचा मदतीचा हात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत २८० हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले.