गुन्हेगारी जगातील क्रूर कृत्यांबाबत आणि गुन्हेगारांबाबत तुम्ही अनेक बातम्या वाचल्या, पाहिल्या असतील. मात्र भारतातील आणि जगातील सर्वात कमी वयाचा सीरियल किलरबाबत माहिती आहे का? ज्या वयात मुलं तिसरी-चौथीत जातात. खेळतात, बागडतात, त्या वयात बिहारमधील या मुलाने अत्यंत क्रूर कृत्य केले. जगात अनेक बालगुन्हेगार झाले. मात्र या मुलाला जगातील सर्वात कमी वयाचा सीरियल किलर म्हणून ओळखले जाते. तो जेव्हा ८ वर्षांचा होता, तेव्हा त्याने कथितपणे तीन जणांची हत्या केली होती.
२००७ मध्ये बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील एक गाव दोन हत्यांच्या घटनांनी हादरून गेले होते. या दोन हत्यांनंतर जेव्हा तिसरी हत्या झाली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली. तेव्हा जी माहिती समोर आली ती ऐकून पोलीस अधिकाऱ्यांसह सामान्य माणसांनाही हादरा बसला. या हत्या एका आठ वर्षांच्या मुलानं केल्या होत्या. या हत्यांमागे त्याने जे कारण दिलं होतं, ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. हत्या करण्यास आपल्याला मजा यायची असा दावा त्याने केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार या मुलाची काही एकदा शहरात गेली होती. तसेच आपल्या मुलांना आरोपीच्या आई-वडिलांकडे सोडून गेली होती. एका आरोपीची आई बाजारात गेली असताना आरोपी मुलाने काकीच्या मुलाची गळा दाबून हत्या केली. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह घराबाहेर नेऊन गवतात लपवला. आई घरी आल्यावर त्याने घडल्या प्रकाराबाबत तिला सांगितले. त्यानंतर आरोपीच्या वडिलांनी त्याला खूप मारले. मात्र ही माहिती पोलिसांना दिली गेली नाही. तसेच काकीला सांगण्यासाठी वेगळीच कहाणी रचली. त्यानंतर आरोपीने त्याच्या आठ वर्षांच्या बहिणीला दुसरी शिकार बनवले. आई-वडील झोपले असताना त्याने बहिणीचा गळा आवळला. आरोपीच्या काकांनी सांगितले की, त्याच्या कुटुंबाला हत्येची माहिती होती. मात्र कौटुंबिक बाब म्हणून ते पोलिसांकडे गेले नाहीत.
२००७ मध्ये आरोपीने तिसऱ्या मुलाची हत्या करेपर्यंत या प्रकाराची माहिती पोलिसांना नव्हती. आरोपीने घराशेजारी राहणाऱ्या एका सहा महिन्यांच्या मुलीला आपली तिसरी शिकार बनवले. काही वेळाने आरोपी मुलाने आपण या मुलीचा गळा आवळ्याचे आणि नंत विटेने ठेचून हत्या केल्याचे कबुल केले. त्यानंतर आरोपी गावकऱ्यांना घटनास्थळी घेऊन गेला.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिला. पोलिस आरोपीला आपल्यासोबत घेऊन गेले. चौकशीमध्ये त्याने आुपण आधीही दोन हत्या केल्याचे कबूल केले. त्याने आपली छोटी बहीण आणि चुलत भावाची हत्या केल्याचे सांगितले. मात्र त्या शिक्षा होऊ शकली नाही. कारण भारतीय कायद्यानुसार कुठल्याही अल्पवयीनाला तुरुंगात पाठवलं जात नाही. त्याला १८ वर्षे पूर्ण होऊपर्यंत बालसुधारगृहात ठेवलं जातं. या आरोपीलाही तसंच ठेवलं गेलं. मानसोपचारतज्ज्ञांनी त्याचा अभ्यास करून त्याला मानसिक आजार असल्याचे सांगितले. मात्र हा आरोपी सध्या कुठे आहे याबाबत कुणाला माहिती नाही कादगोपत्रावरील उल्लेखांनुसार तो सध्या २४ वर्षांचा झालेला आहे.