Crime : दोन मुलांची आई इन्स्टाग्रामवर ७ वर्षांनी लहान तरुणाच्या पडली प्रेमात, पतीला गोळी देऊन झोपवले आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:36 PM2023-03-16T12:36:49+5:302023-03-16T12:37:43+5:30
Love Affair: काही दिवसांपूर्वी एक महिला तिच्या दोन मुलांना सोबत घेऊन घरातील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली होती. याबाबत पतीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.
उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी एक महिला तिच्या दोन मुलांना सोबत घेऊन घरातील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली होती. याबाबत पतीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच तिला मध्य प्रदेशमधून शोधून काढले. ही २७ वर्षीय महिला इन्स्टाग्रामवर भेटलेल्या ७ वर्षांनी लहान तरुणासोबत पळून गेली होती. पोलीस तिला ताब्यात घेऊन परत घेऊन आले. मात्र आता तिने पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे. सहर महिला आणि तिचा ७ वर्षांनी लहान प्रियकर एकत्र राहण्यासाठी अडून बसले आहेत. तर पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोहाघाट येथील राहणारी ही महाला एक वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवर मनोज गुर्जर नावाच्या तरुणाला भेटली होती. त्यांच्यामध्ये बोलणं होऊ लागलं. पाहता पाहता त्यांच्यामधील जवळीक वाढू लागली. त्यातून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मनोज या महिलेला भेटण्यासाठी दोन वेळा लोहाघाट येथे आला होता. तीन मार्चला तो पुन्हा लोहाघाटला आला. त्याने या महिलेला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. तिने त्या पतीला खायला देऊन झोपवले. त्यानंतर ती दोन मुले, ५२ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख घेऊन घरातून फरार झाली. तसेच एफडी आणि एलआयसीचे पेपरही तिने पळवले.
घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेच्या पतीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सर्व्हिलान्सच्या मदतीने महिलेचं लोकेशन मध्य प्रदेशमध्ये सापडलं. त्यानंतर पोलिसांनी तिथे धाव घेत त्यांना पकडले.
सीओ विपिन चंद्र पंत यांनी सांगितले की, मनोजने १४ तोळे सोनं एका दुकानामध्ये साडे सात लाख रुपयांना विकले. मनोजच्या एका नातेवाईकाने या कामात त्याला मदत केली. आता सदर महिला आणि मनोजविरोधात आयपीसी कलम ३६५, ३८०/४११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहे. तसेच दोन्ही मुलांना आजोबांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.