गेंदालाल मिल परिसरातील हाणामारीप्रकरणी चौघे अटकेत दोन्ही गटातील १० जणांविरुद्ध गुन्हा : रविवारी रात्री उफाळला होता वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2016 12:34 AM
जळगाव : गेंदालाल मिल परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एका गटातील चौघांना अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
जळगाव : गेंदालाल मिल परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एका गटातील चौघांना अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.याबाबत दोन्ही गटातील सदस्यांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. पहिल्या गटाकडून अशपाक खान बिस्मिल्ला खान (वय २८, रा.शिवाजीनगर) याने फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी जावेद लाला, जुनेद, एजाज, जुबेर, ज्ञानेश्वर वाघ, विजय वाघ, विशाल ठाकूर (सर्व रा.गेंदालाल मिल) यांनी १३ मार्चला रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास गेंदालाल मिलसमोर फिर्यादी अशपाक खान याला शिवीगाळ, दमदाटी करत चाकूने मारून जखमी केले. तसेच त्याच्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण केली. अशपाकने रेल्वे पोलीस बलातील एस.बी. सिंग व कर्मचार्याविरुद्ध जळगाव न्यायालयात केलेली केस मागे घेऊन तडजोड करावी किंवा साक्षीला जाऊ नये, या कारणावरून हा प्रकार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून वरील संशयितांवर भादंवि कलम ३२६, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास सहायक पोलीस निरीक्षक जानकर करीत आहेत.दुसर्या गटाच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हादुसर्या गटाकडून जुनेद बशीर खान (वय १७, रा.गेंदालाल मिल) याने फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी अशपाक खान, इकबाल खान व सलीम गोल्या यांनी, फिर्यादी जुनेद खान याला खुन्नस देऊन का पाहतो, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास हेड कॉन्स्टेबल बडगुजर करीत आहेत.चौघांना अटकया प्रकरणात शहर पोलिसांनी जावेद लाला, जुबेर, विशाल ठाकूर, ज्ञानेश्वर वाघ या चौघांना अटक केली आहे.