नवी दिल्ली : सीबीआयने तालाबिरा-१ कोळसा खाणपट्ट्याच्या वाटप प्रकरणातील इन्डाल सध्याचे नाव हिंदाल्को या आदित्य बिर्ला समूहाच्या कंपनीविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल केला आहे. २० वर्षांपूर्वी या कंपनीला हा खाणपट्टा वितरित केला होता.सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर या कंपनीच्या मुंबई तसेच ओडिशातील संबलपूर येथील तीन ठिकाणी शोधमोहीम राबवली. या कंपनीने सध्याच्या वीज प्रकल्पासाठी अनधिकृतपणे कोळशाचा वापर चालविला होता. वितरण मात्र नव्या वीज प्रकल्पाच्या क्षमतेनुसार करण्यात आले होते. या कंपनीने परवानगीविनाच खाणकाम सुरु केले होते. सीबीआयने तत्कालीन इन्डाल या कंपनीच्या तसेच अज्ञात कर्मचाऱ्यांच्या नावाने गुन्हा नोंदविला आहे. अधिकाऱ्यांनी माहिती असतानाही बेकायदा खाणकामाकडे डोळेझाक केल्याचा आरोप आहे.बिर्ला समूहाकडून दुजोरा१९९४ मध्ये पूर्वाश्रमीच्या इन्डाल कंपनीला १९९४ मध्ये तालाबिरा-१ कोळसा खाणपट्ट्याचे वाटप करण्यात आले होते. देशभरातील १८५ कोळसा खाणींचा तपास केला जात असून त्या अनुषंगाने सीबीआयने कंपनीच्या तीन स्थळांवर शोधमोहीम चालविली असल्याचे आदित्य बिर्ला समूहाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
हिंदाल्कोविरुद्ध गुन्हा
By admin | Published: January 24, 2015 1:47 AM