शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालणाऱ्या नऊ आमदारांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 6:34 AM

शिरोमणी अकाली दलाचे आमदार शरणजित सिंह ढिल्लों, विक्रमसिंह मजीठिया, बलदेवसिंह खैरा, सुखविंदर कुमार, हरिन्दरपालसिंह चंदूमाजरा, कंवरजितसिंह बारकंडी, मनप्रीतसिंह अयाली, गुरप्रतापसिंह वडाला व एन. के. शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंडीगढ : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना मागील आठवड्यात विधानसभेबाहेर घेराव घालण्याचा प्रयत्न केल्यावरून चंडीगढ पोलिसांनी पंजाबच्या शिरोमणी अकाली दलाच्या नऊ आमदारांवर गुन्हा दाखल केला आहे. (Crime against nine MLAs for besieging Haryana Chief Minister)शिरोमणी अकाली दलाचे आमदार शरणजित सिंह ढिल्लों, विक्रमसिंह मजीठिया, बलदेवसिंह खैरा, सुखविंदर कुमार, हरिन्दरपालसिंह चंदूमाजरा, कंवरजितसिंह बारकंडी, मनप्रीतसिंह अयाली, गुरप्रतापसिंह वडाला व एन. के. शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरोमणी अकाली दलाने हा प्रकार दुर्भाग्यपूर्ण व लोकशाहीच्या विरोधातील असल्याचे म्हटले आहे. चंडीगढ पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम १८६ (लोकप्रतिनिधीला सरकारी कामकाज करण्यात अडथळा आणणे), ३२३ (हेतुपुरस्सरपणे जखम करणे) व ३४१ (बेकायदेशीररीत्या रोखणे) आदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१० मार्च रोजी ‘शिअद’च्या आमदारांनी विधानसभा हॉलबाहेर खट्टर यांना घेराव घातला होता व नवीन कृषी कायद्याच्या विरोधात विधानसभेत एक प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली होती. या प्रकारानंतर हरियाणा विधानसभा सचिवालयाने खट्टर यांच्याशी असभ्य वर्तन केल्यावरून पंजाबच्या या आमदारांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे गृहसचिव राजीव अरोरा व पोलीसप्रमुख मनोज यादव यांच्यासमवेतच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुप्ता यांनी सोमवारी (दि. १५) या घटनेचा निषेध केला व ‘शिअद’ आमदारांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घातला; तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले. गुप्ता यांनी दूरध्वनीवरून पंजाब विधानसभा अध्यक्ष के. पी. सिंह यांच्याशी चर्चाही केली व त्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, असा आग्रहही केला.

गुन्हा दाखल करणे दुर्भाग्यपूर्ण - दलजितसिंह चीमा  - शिरोमणी अकाली दलाचे नेते व माजी मंत्री दलजितसिंह चीमा यांनी नऊ आमदारांवर गुन्हा दाखल करण्याचे पाऊल दुर्भाग्यपूर्ण व लोकशाहीच्या विरोधात असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले की, शिरोमणी अकाली दलाच्या आमदारांनी विधानसभेच्या बाहेर खट्टर यांच्याविरोधात निदर्शने केली होती. 

टॅग्स :HaryanaहरयाणाPoliticsराजकारणBJPभाजपाMLAआमदार