नवी दिल्ली : गुजरातमध्ये महिलांविरुद्धचे गुन्हे वाढत असल्याचे सांगत, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी येथे लक्ष्य केले. महिलांच्या सुरक्षेबाबत काळजी व्यक्त करतानाच मोदी हे केवळ आश्वासने देत असल्याचा आरोप केला.राहुल गांधी हे या निवडणुकीत मोदी यांना दररोज एक प्रश्न विचारत आहेत. त्यानुसार, त्यांनी आज हा पाचवा प्रश्न उपस्थित केला आहे आणि मोदी सरकारच्या आश्वासने पाळण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. यानंतर प्रत्युत्तर देताना केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आरोप केला की, यातून काँग्रेसची सरंजमशाही व्यवस्था दिसून येते.
महिलांविरुद्ध गुन्हे वाढले राहुल गांधी यांनी केले मोदींना लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 2:59 AM