शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

Crime News: दिवसाढवळ्या 21 वर्षीय तरुणीचा खून, आरोपी युवक पोहोचला पोलीस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 3:51 PM

Crime News: रिंकूसोबत आणखी कोण कोण होते, हे सीसीटीव्हीह फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून तपासण्यात येत आहे.

लखनौ - उत्तरप्रदेश राज्यातील बागपत येथे गुरुवारी दिवसाढवळ्या 21 वर्षीय दिपा या तरुणीची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे ही हत्या गर्दीच्या ठिकाणी करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यावेळी दिपाची 8 वर्षीय भाच्चीही दिपासमेवत होती, या घटनेवेळी ती मदतीसाठी मोठमोठ्यानं हाक देत होती. मात्र, कुणीही मदतीला आलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रिंकूला अटक केली असून अधिक तपास करण्यात येत आहे. 

रिंकूसोबत आणखी कोण कोण होते, हे सीसीटीव्हीह फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून तपासण्यात येत आहे. याप्रकरणी आणखी कोणाचे नाव समोर आल्यास, त्यासही अटक करण्यात येईल, असे बागपतचे एसपी नीरज कुमार यांनी म्हटलं आहे. बागपतच्या संकरी गल्लीत कॉलेजमधील क्लर्क असलेले नैनसिंह राहत होते. त्यांना 7 मुली असून सर्वात लहान मुलगी ही दिपा होती. त्यांच्या सहाही मुलींचे लग्न झाले होते. तर, दिपा ही पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती. घरची परिस्थिती नाजूक असल्याने दिपा कुटुंबीयांचा सहारा बनू इच्छित होती. तिला शिक्षिका व्हायचं होतं, त्यासाठी सकाळी 11 वाजता नोकरी अर्ज करण्यासाठी ती घरातून बाहेर पडली. त्यावेळी रिंकूने भरचौकात तिचा हात पकडून तिच्यासोबत जबरदस्ती केली. त्यानंतर, तिच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. दिपासोबत असलेल्या तिच्या भाच्चीने ही घटना कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर, घरच्यांनी घटनास्थळ गाठले. पण, दिपा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. तर, इकडे रिंकूने पोलीस ठाणे गाठून स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. 

दरम्यान, रिंकू कश्यप दिपावर एकतर्फी प्रेम करत होता, दिपाने त्यास बोलण्यास नकार दिला. त्यावेळी, मला बोलली नाहीस तर तुला ठार मारेन, अशी धमकीही रिंकूने दिपाला दिली होती.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश