शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

एकाच शहरात 2 पत्नींसोबत राहत होता तरुण; सत्य समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 1:03 PM

Crime News : तरुण त्याच्या दोन पत्नींसह वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होता. तो वेळ काढून दोघींकडे जायचा. मात्र त्याच्या दोन्ही पत्नींना याबाबत जराही कल्पना नव्हती.

नवी दिल्ली - हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात एका तरुणाने दोन लग्न केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाने आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेला नाही. तरीही हा तरुण त्याच्या दोन पत्नींसह वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होता. तो वेळ काढून दोघींकडे जायचा. मात्र त्याच्या दोन्ही पत्नींना याबाबत जराही कल्पना नव्हती. तरुणाला दोन्ही पत्नींपासून मुलेही आहेत. मात्र पहिल्या पत्नीने तिला संशय आल्य़ावर आता त्याची पोलखोल केली आहे. त्याला पकडल्यानंतर आता आरोपी पती तिला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे.

पीडितेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत तिने मुरथळ येथील एका सोसायटीत राहत असल्याचं म्हटलं आहे. 2004 मध्ये रवींद्र मान याच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. बरेच दिवस दोघंही मुलीसोबत सुखाने राहत होते. मात्र काही दिवसांपासून पीडितेनं सांगितले की, तिच्या पतीने तिला वेळ देणं बंद केलं होतं. तो कामाच्या बहाण्याने घराबाहेर पडत असे. तिला संशय आल्यावर ती एके दिवशी तिच्या पतीच्या मागे गेली. तिनं त्याचा पाठलाग केला. 

संशयानंतर बिंग फुटलं; अशी झाली पोलखोल

पाठलाग करताना ती सेक्टर-23 मध्ये पोहोचली, तिथे तिचा पती आणि दुसरी महिला आढळून आली. याबाबत तिने चौकशी केली असता ती त्याची दुसरी पत्नी असल्याचं समोर आलं. जिच्यापासून त्याला दोन मुलं आहेत. जे शहरातील खासगी शाळेत शिकतात. मुलाच्या वडिलांचं नाव रवींद्र असे लिहिल्याची माहिती शाळेकडून मिळाली. या संदर्भात तिने पती रवींद्र याला विचारलं असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्याचे ठोस पुरावे समोर ठेवताच तो तिला धमक्या देऊ लागला.

पतीला माझी आणि मुलीची हत्या करायची असल्याचा पीडितेचा आरोप

पतीला माझी आणि मुलीची हत्या करायची असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षकांना देण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून मुरथळ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच आरोपीला अटक करून पुढील कारवाई केली जाईल असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी