शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

लग्नानंतर 6 महिन्यांनी 'ती' सासरी आली अन् पतीचा काढला काटा; बॉयफ्रेंडच्या मदतीने असा रचला कट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:23 PM

Crime News : तरुणाच्या पत्नीवर हत्येचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तिने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीला मारल्याचं म्हटलं जात आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान बिहारच्या जमुईमध्ये 6 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाच्या पत्नीवर हत्येचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तिने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीला मारल्याचं म्हटलं जात आहे. जिल्ह्यातील चंद्रदीप पोलीस स्टेशन हद्दीतील सांपो गावात ही घटना घड़ली आहे. तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली. सांपो गावाजवळील शेतात त्याचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

विकास कुमार असं तरुणाचं नाव आहे. मृताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मृताची पत्नी काजल कुमारी हिने बॉयफ्रेंडला फोन करून पतीची ओळख करुन दिली होती आणि बॉयफ्रेंडच्या मदतीनेच माझ्या भावाची हत्या करण्यात आली. लग्नानंतर 10 डिसेंबर रोजी पत्नी तिच्या माहेरून सासरच्या घरी आली होती. घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मंगळवारी संध्याकाळी विकास कुमार उर्फ ​​विकीला कोणीतरी फोनकरुन घराबाहेर मोटरसायकल दुरुस्त करण्यासाठी बोलावलं होतं. 

विकास त्यानंतर घरी परतलाच नाही. त्याच्या कुटुंबीयांनी गावभर त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेच सापडला नाही. यानंतर सकाळी गावाजवळील शेतात त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता त्यांना मृतदेह दिसला. मृत विकास उर्फ ​​विकीची पत्नी काजल कुमारी देखील घटनास्थळी पोहोचली असता तिला पाहून गावकरी संतप्त झाले. लोकांनीही या हत्येसाठी पत्नीला जबाबदार धरले. तरुणाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पत्नी काजल कुमारीने शेखपुरा जिल्ह्यातील दिघापर गावातील एका तरुणाला बोलावलं होतं. त्यानंतर मृताच्या पत्नीने तो तरुण आपला भाऊ असल्याचं सासऱ्याच्या लोकांना सांगितलं होतं.

विकासची पत्नी काजल कुमारीनं त्या तरुणाला पतीची ओळख पटवून देण्यासाठीच त्याला बोलावलं होतं आणि याच तरुणानं हत्येची घटना घडवून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी एसडीपीओ डॉ राकेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले असून, तिची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून पत्नीने पतीची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. सध्या तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी