भाडेकरुंची माहिती लपविणार्या ४९ घरमालकाविरोधात पोलिसांनी नोंदविले गुन्हे
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
भाडेकरूंची माहिती लपविणार्या ४९ घरमालकांविरोधात पोलिसांनी नोंदविले गुन्हे
भाडेकरूंची माहिती लपविणार्या ४९ घरमालकांविरोधात पोलिसांनी नोंदविले गुन्हेऔरंगाबाद : पोलीस आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून भाडेकरूंची माहिती लपविणार्या शहरातील ४९ घरमालकांविरोेधात गुन्हेशाखेच्या पोलिसांनी वेगवेगळ्या ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून, प्रत्येक घरमालकाने त्यांच्याकडे भाड्याने राहणार्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता, याबाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहन गुन्हेशाखेच्या पोलिसांनी केले आहे.देशात आतापर्यंत घडलेल्या दहशतवादी घटनांचा अभ्यास केल्यानंतर दहशतवादी हे काही दिवस येथे भाड्याने लॉजमध्ये थांबून गेल्याची माहिती पोलिसांना मिळते. शहरात दाखल होणार्या नवख्या व्यक्तीची माहिती तातडीने पोलिसांना प्राप्त झाल्यास समाजकंटक तातडीने पोलिसांच्या हाती लागू शकतात. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी शहरातील घरमालक, हॉटेल्स, लॉज येथे रूम भाड्याने घेऊन राहणारे, तसेच मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च, धर्मशाळा आदी ठिकाणी आश्रयास येणार्या प्रत्येक व्यक्तीची माहिती पोलिसांना देण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात जाऊन सांगणे घरमालकांना बंधनकारक आहे, असे असताना अनेकांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे गुन्हेशाखेच्या पोलिसांनी केलेल्या विशेष तपासणीत समोर आले आहे. त्यावरून गुन्हेशाखेने अशा बेजबाबदार घरमालकांविरोधात क ारवाई सुरू केली आहे. आज शनिवारी शहरातील वेगवेगळ्या ४९ घरमालकांविरोधात गुन्हे दाखल केले. ही कारवाई उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त बाबाराव मुसळे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेष थिटे, सुरेश खाडे, सुभाष खंडागळे, गिरीधर ठाकूर यांनी केली. शहरातील घरमालक, वाहन खरेदी-विक्री करणारे, धार्मिक स्थळांचे प्रमुख, हॉटेल्स, लॉजेस यांनी त्यांच्याकडे थांबणारी प्रत्येक व्यक्ती, प्रवाशाची माहिती पोलिसांना द्यावी, अन्यथा त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.