निवेदन : नागरिकांचा आरोपसातपूर : परिसरात होणार्या घरफोड्या, चोर्या आणि लुटमारीमुळे नागरिक भयभीत झाले असून, गुन्हेगारांवर कारवाई करून रात्रीची गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कारंजे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे नागरिकांनी केली आहेे. सातपूर विभागातील सोमेश्वर कॉलनी, सद्गुुरुनगर, खांदवेनगर, सोमेश्वर कॉलनी, प्रबुद्धनगर भागात कष्टकरी कामगार मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. या भागात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या, वाहन चोरी, लुटमारीसारखे गैरप्रकार सुरू आहेत. या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. आतापर्यंत घडलेल्या गुन्ांची नोेंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे; मात्र पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. येत्या आठ दिवसांत कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक ज्योती शिंदे, अरुण काळे, बजरंग शिंदे, कैलास सोनवणे, सुनील सोनवणे, अविनाश गिते, संजय गुंजाळ, विजय शिरोळे, बी. एम. ढेमसे, एस. एल. वरखेडे, मोहन नेऊलकर, एच. एच. जाधव, संजिता बोडके, नागेश तिवारी, दीपक श्िंादे, योगेश देवरे आदिंसह नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. फोटो======परिसरातीलल गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कारंजे यांना देताना माजी नगरसेवक ज्योती श्िंादे, बजरंग शिंदे, शिवाजी वरखेडे, अरुण काळे, कैलास सोनवणेे, संतोष सिंग, आकाश भदाणे, प्रमोद वाघमारे, सीमा पाटील, एस. एस. तायडे, मुकुंद गागंुडेर्े आदिंसह नागरिक.
सातपूर परिसरातील गुन्हेगारीत वाढ
By admin | Published: July 10, 2015 9:26 PM