शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

Crime: लग्न ठरेना, दोन सख्ख्या दिरांनी वहिनीसोबत केलं भयानक कृत्य, पाहणाऱ्यांचा उडाला थरकाप 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 1:24 PM

Crime News: पोलीस ठाण्यापासून केवळ २०० मीटर  अंतरावर दुहेरी हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन सख्ख्या दिरांनी आपल्या वहिनीची हत्या केली. तसेच वादात मध्ये पडलेल्या एका शेजाऱ्यालाही त्यांनी जिवे मारले.

राजस्थानमधील जालौरच्या मोदरान गावामध्ये पोलीस ठाण्यापासून केवळ २०० मीटर  अंतरावर दुहेरी हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन सख्ख्या दिरांनी आपल्या वहिनीची हत्या केली. तसेच वादात मध्ये पडलेल्या एका शेजाऱ्यालाही त्यांनी जिवे मारले. त्यानंतर या दोन्ही दिरांपैकी एकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

कौटुंबिक कलह आणि साखरपुड्याच्या विषयावरून झालेल्या वादानंतर दोन्ही दिरांनी कुऱ्हाडीने वार करून वहिनीची हत्या केली. या दरम्यान आरोपींनी १२ वर्षांच्या पुतण्यावरही कुऱ्हाडीने हल्ला केला. जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रामसीन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रतनसिंह यांची पत्नी इंद्रा कंवर (४५) ह्या त्यांची मुलगी आणि मुलासह घरात होत्या. त्यावेळी त्यांचे सख्ख्ये दिर डुंगरसिंह आणि पहाडसिंह आपलं लग्न न झाल्याने आणि पुतणीचं (इंद्रा यांची मुलगी) साट्या लोट्यानं लग्न न केल्याने नाराज झाले होते. त्यावरून वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर दोघांनीही आपल्या सख्ख्या वहिनीवर कुऱ्हाडीने हल्ला केला.

या दरम्यान, शेजारी हरिसिंहने आरोपींना आईसमान असलेल्या वहिनीसोबत भांडू नका, असा सल्ला दिला. तेव्हा आरोपी त्याच्या मागे धावून गेले आणि कुऱ्हाडीने वार करून त्यांनी त्याची हत्या केली.  यादरम्यान त्यांनी पुतण्यावरही वार केला. त्यानंतर आरोपींपैकी एकाने विषप्राषन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानFamilyपरिवार