क्राईम
By admin | Published: July 03, 2015 10:55 PM
केपेचे जुने टपाल कार्यालय पाडले
केपेचे जुने टपाल कार्यालय पाडलेकेपे : केपे बाजारात असलेले पोर्तुगीजकालीन टपाल कार्यालय शुक्रवारी पालिकेने केलेल्या कारवाईत पाडून टाकले. हे कार्यालय धोकादायक स्थितीत असल्याने ते पाडण्याचे आदेश केपेचे उपजिल्हाधिकारी शंकर गावकर यांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली़केपे बाजारात जी शासकीय इमारत उभारली आहे़ त्याच्यामागे हे जुने टपाल कार्यालय होते. या कार्यालयाची पडझड झाल्याने ते धोकादायक स्थितीत होते. ते बांधकाम पाडावे यासाठी अंजली डिकॉस्ता व उपनगराध्यक्ष कामिलो सिमोईश यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले होते. त्यानुसार हे बांधकाम ३0 दिवसांत पाडावे, असा लेखी आदेश उपजिल्हाधिकारी गावकर यांनी टपाल कार्यालयाला दिली होता. मात्र, या आदेशाकडे टपाल खात्याने दुर्लक्ष केल्याने पालिकेच्या कामगारांकडून हे पाडण्यात आले. या कारवाईच्यावेळी उपजिल्हाधिकारी गावकर तसेच पालिकेचे मुख्याधिकारी प्रमोद देसाई उपस्थित होते. (वार्ताहर)ढँङ्म३ङ्म : 0307-टअफ-05कॅप्शन: टपाल कार्यालयाची इमारत पाडताना मुख्याधिकारी प्रमोद देसाई. (छाया: ख्रिस्तानंद पेडणेकर)