रंगनाथ मंदिरातील मुकुट चोरणार्यास अटक
By admin | Published: September 03, 2015 11:05 PM
सोलापूर : एमआयडीसी हद्दीतील रंगराजनगर येथील रंगनाथ मंदिरातील चांदीचे मुकुट व दागिने चोरलेला अ?ल चोरटा बसण्णा सत्तू शिंदे (रा. गोंधळी वस्ती, शिवाजी नगर) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
सोलापूर : एमआयडीसी हद्दीतील रंगराजनगर येथील रंगनाथ मंदिरातील चांदीचे मुकुट व दागिने चोरलेला अ?ल चोरटा बसण्णा सत्तू शिंदे (रा. गोंधळी वस्ती, शिवाजी नगर) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. रंगनाथ मंदिरात दि. 23 ऑगस्ट 2015 रोजी अज्ञात चोरट्याने मंदिराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून देवीच्या चांदीचे मुकुट व नक्षीकाम केलेल्या सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. बसण्णा शिंदे हा गुन्हा झाल्यापासून पोलिसांची नजर चुकवून फिरत होता. ठावठिकाणा शोधून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दोन मंदिरात चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून दीड किलो वजनाचा चांदीचा मुकुट, चांदीचा 700 ग्रॅम वजनाचा शिरटोप, एक सोन्याचे पदक, देवीचे सोन्याचे पदक, चांदीचे दागिने, दानपेटीतील 1200 रुपये, अर्धा तोळे सोन्याची अंगठी, दोन लहान कर्णफुले, एक चांदीचा गणपती, एक चांदीचे पैंजण आदी ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, बालसिंग रजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रणजित माने, सपोनि बाळासाहेब शिंदे, पोलीस नाईक रवी परबत, मुबारक मुजावर, बळीराम माशाळकर, अप्पा पवार, पो.कॉ. सागर सरतापे, अशोक लोखंडे, शंकर मुळे यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)चौकट..तडीपार आरोपीस अटक याच भागातील तडीपार आरोपी किरण नागनाथ शिंदे (रा. गोंधळे वस्ती, सोलापूर) यास दोन वर्षांसाठी सोलापुरातून तडीपार करण्यात आले आहे. असे असताना तो पोलिसांची नजर चुकवून शहरात फिरत होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक करून कारवाई केली आहे.