राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी नथुराम गोडसे याला १५ नोव्हेंबर १९४९ मध्ये अंबाला येथील मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली होती.
कुलजित सिंग व जसबिर सिग या दोघांना दोन अल्पवयीन मुलांच्या हत्येप्रकरणी १९८२ मध्ये फाशीची शिक्षा झाली होती.
अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणा-या जोशी - अभ्यंकर खुन खटल्यातील चारही गुन्हेगारांना २७ नोव्हेंबर १९८३ मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली. राजेंद्र नक्कल दिलीप सुतार शांताराम जगताप व मुनावर शहा अशी गुन्हेगारांची नावे आहेत. या चौघा तरुणांनी लुटमार करताना तब्बल १० लोकांची अत्यंत अमानूषपणे हत्या केली होती.
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येप्रकरणी सतवंत सिंग व केहर सिंग या दोघांना ६ जानेवारी १९८९ मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती.
सुखदेव सिंग सुखा व हरजिंदर सिंग जिंदा - सैन्याचे प्रमुख अरुणकुमार वैद्य व ललित माकन यांच्या हत्येप्रकरणी खलिस्तान कमांडो फोर्सचे सुखदेव सिंग सुखा व हरजिंद सिंग जिंदा या दोघांना फाशीची शिक्षा ठोठोवण्यात आली. ९ ऑक्टोबर १९९२ मध्ये या दोघांना पुण्यातील येरवडा कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली.
ऑटो शंकर - सहा अल्पवयीन मुलींवर बलात्कार व त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करणा-या ऑटो शंकर या सिरीयल किलरच्या क्रूरकृत्यांनी १८८८ ते ८९ या काळात दहशत माजवली होती. याप्रकरणात ऑटो शंकरला २५ ऑगस्ट १९९५ रोजी तामिळनाडूत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
धनंजय चॅटर्जी - १९९०मध्ये कोलकाता येथील हेतल पारेख या अल्पवयीन मुलीवर बलात्कार व त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी धनंजय चॅटर्जी या नराधमाला ऑगस्ट २०१४ मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली.
अफजल गुरु - २००१ मध्ये संसदेवरील हल्ल्याप्रकरणी अफजल गुरुला फेब्रुवारी २०१३ मध्ये दिल्लीतील तिहार तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली. अफजल गुरुच्या फाशीवरुन गदारोळ झाला होता. फाशीची अंमलबजावणी करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला गेला. अफजल गुरुच्या फाशीला "ऑपरेशन थ्री स्टार" असे म्हटले जाते.
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाब हा फासावर लटकवलेला शेवटचा गुन्हेगार होता. १२ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात कसाबला फाशी दिली गेली.
३० जुलै २०१५ रोजी सकाळी सातच्या सुमारास १९९३च्या मुंबई बाँबस्फोटातला एक मुख्य सूत्रधार याकूब मेमनला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये फासावर लटकवण्यात आलं. भारतात दुर्मिळात दुर्मिळ गुन्ह्यांमध्येच फाशी दिली जाते. काही महत्त्वाच्या खटल्यांमध्ये फाशी दिले गेलेले गुन्हेगार.