केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील राजमाला भागात मुन्नार टेकडीवर आज मोठी दुर्घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती आहे. अशातच आज एक मोठा डोंगर लोकवस्तीवर कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू तर 80 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
घटनास्थळी मदतकार्य सुरु झाले असून 15 अॅम्बुलन्सही पोहोचल्या आहेत. या घटनेत आतापर्यंत 5 मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 10 जणांना जखमीअवस्थेत वाचविण्यात आले आहे. केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी भारतीय हवाई दलाला मदतीची विनंती केली आहे.
केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, एक मोबाईल मेडिकल टीम आणि 15 अँम्बुलन्स पाठविण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचविण्यासाठी एनडीआरएफसोबत अग्निशमन दल आणि पोलीस जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
नाशिक हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची निघृण हत्या; दोन लहान मुलांचाही समावेश
नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा
मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली
‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा; शिवसेना आमदाराचे गृहमंत्र्यांना पत्र
Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??
सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले
आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च
सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...