नवी दिल्ली : ५२ लाख रुपयांचा प्राप्तिकर न भरल्याने माजी क्रिकेटपटू व पंजाबचे विद्यमान पर्यटनमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची दोन बँक खाती प्राप्तिकर खात्याने गोठविली२०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या प्राप्तिकर परताव्यामध्ये त्यांनी दाखविलेल्या खर्चाची बिले सिद्धू सादर करू शकलेले नाहीत. त्यांनी ५२ लाख रुपयांचा प्राप्तिकर भरलेला नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे प्राप्तिकर खात्याने म्हटले आहे. ही कारवाई करण्याच्या आधी सिध्दू तीन नोटिसाही पाठविल्या होत्या.गेल्या दहा वर्षांपासून आपण काटेकोरपणे प्राप्तिकर परतावा सादर करीत असून, त्यात आजवर कोणतीही उणीव मिळालेली नाही, असे सिद्धू यांनी प्राप्तिकर खात्याला असे सांगितल्याचे समजते.असा दाखविला खर्च : सूत्रांनी सांगितले की, सिद्धू यांनी या प्राप्तिकर परताव्यात ३८,२४,२८२ रुपये प्रवासखर्च, २८,३८,४०५ रुपये वस्त्रांची खरेदी, ४७,११,४०० रुपये कर्मचाऱ्यांचे वेतन आणि १७,८०,३५८ रुपये इंधनावर खर्च झाल्याचे नमुद केले आहे. मात्र या खर्चाची बिले ते सादर करु शकले नाहीत.
नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत, दोन बँक खाती गोठविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 4:09 AM