मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत शेतकºयांमधील असंतोषाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी त्याची चुणूक दाखवून दिली आहे. या निकालांच्या धसक्यानेच देशातील तब्बल १५ राज्यांना विविध शेतकी योजनांची घोषणा करावी लागल्याचा दावा, स्वराज इंडिया पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांनी केला.मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित वार्तालापात योगेंद्र यादव यांनी पाच राज्यांतील निवडणुकांचा अन्वयार्थ आणि त्याच्या परिणामावर भाष्य केले.येत्या निवडणुकीत भाजपाच्या जागा किमान शंभरने कमी होण्याची शक्यता आहे. सध्याचे वातावरण पाहता १५० ते २०० दरम्यान भाजपा राहील. काँग्रेस स्वत:ला सक्षम पर्याय म्हणून सिद्ध करते किंवा नाही यावर भाजपा १५० च्या आसपास राहणार की २०० च्या घरात जाणार हे ठरेल, असे यादव म्हणाले.मोदींचे पाच ‘एम’केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची भिस्त पाच ‘एम’वर टिकून आहे. यात पहिला एम म्हणजे स्वत: मोदी, त्यानंतर मंदिर, मशीन (भाजपाची निवडणूक यंत्रणा), मीडिया आणि मनी, असे यादव म्हणाले.
येत्या निवडणुकांत शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक - योगेंद्र यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 5:10 AM