गोरखपूर : ‘पद्मावती’ चित्रपटातील कलाकारांना धमक्या देणारे जसे दोषी आहेत तसे निर्माते संजय लीला भन्साळीही काही कमी दोषीनाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी त्यांना लक्ष्य केले; आणि भन्साळी यांना लोकांच्या भावनांशी खेळण्याची सवय झाली आहे, अशी टीकाही केली.योगी आदित्यनाथ म्हणाले की, कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. मग ते संजय लीला भन्साळी असोत की, अन्य कोणी. चित्रपट कलाकारांना धमक्या देणारे जसे दोषी आहेत तसे भन्साळीही दोषी आहेत. कारवाई करायची झाली तर दोघांवरही झाली पाहिजे. कलाकारांना दिलेल्या धमक्यांविषयी ते म्हणाले की, एकमेकांच्या भावनांचा सन्मान केला तर समस्या निर्माण होणार नाहीत.राज्य सरकारने ‘पद्मावती’तील आक्षेपार्ह दृश्ये हटविल्याशिवाय उत्तर प्रदेशात चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देणार नाहीत, असे १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केले आहे. >तोडग्याचा प्रयत्नजे वातावरण निर्माण झाले आहे, त्यास सेन्सॉर बोर्ड कारणीभूत नाही. आम्ही वादातून तोडगा काढू इच्छित आहोत, असे बोर्डाचे अध्यक्ष प्रसुन जोशी यांनी म्हटले आहे.>दीपिकाचे शीर सुरक्षित राहावे!अभिनेते कमल हासन म्हणाले की, दीपिकाच्या स्वातंत्र्याचा सन्मान करावा. दीपिकाचे शीर सुरक्षित राहायला हवे. अनेक समुदायांनी माझ्या चित्रपटांनाही विरोध केला होता. वादविवादात अतिरेक निंदनीय आहे.
धमक्या देणा-यांप्रमाणेच भन्साळीही दोषी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 4:08 AM