शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर
2
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
3
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
4
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
5
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
6
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती
7
LLC 2024 : जणू काही 'लसिथ मलिंगा'! मराठमोळ्या केदार जाधवच्या गोलंदाजीने जुन्या आठवणींना उजाळा
8
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
9
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
10
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
11
महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका
12
Navratri 2024: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपाची पुजा का? जाणून घ्या कारण!
13
LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक
14
Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा
15
Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले
16
मोफत रेशनचं आमिष दाखवून घेतात लोकांचं आधार कार्ड अन् नंतर थेट चीनमधून येतो कॉल
17
सणासुदीदरम्यान No-Cost EMI वर शॉपिंग करताय? त्यापूर्वी जाणून घ्या याचा फायदा होतो की नुकसान?
18
Women's T20 World Cup 2024 : आतापर्यंत ८ वेळा रंगली स्पर्धा, पण फक्त २ वेळा दिसला नवा विजेता
19
Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान

क्रोमा कंपनीचा कंटेनर लुटणारे गजाआड

By admin | Published: September 04, 2015 10:46 PM

क्रोमा कंपनीचा कंटेनर लुटणारे गजाआड

क्रोमा कंपनीचा कंटेनर लुटणारे गजाआड
चालकाचा शोध सुरु
मुंबई: क्रोमा कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक मालाच्या कंटेनरसह पसार झालेल्या त्रिकुटाच्या दरोडा विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. तर यातील चालकाचा शोध सुरु आहे. माझ हबीबुल्लाह बगा (४५), युसूफ समशेर खान (५२) आणि अदम अब्बास पटेल (२५) अशी अटक केलेल्या त्रिकुटाचे नावे असून त्यांच्याकडून २४ लाख किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
भिवंडी येथील गोडाऊनमधून क्रोमा कंपनीचे इलेक्ट्रीक सामान मुंबईत आणण्याचे काम तक्रारदार दिलीप कदम करतात. २६ ऑगस्ट रोजी अंधेरी येथील क्रोमा शोरुममध्ये इलेक्ट्रॉनिक सामान पोहचविण्यासाठी आरोपी चालकाला पाठविण्यात आले होते. मात्र चालकाने खान आणि अब्बासच्या मदतीने कंटेनरमधील सामान घेऊन पळ काढला होता. मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी जबरी चोरी दरोडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत यांचे तपास पथक समांतर तपास करत होते. बुधवारी खान आणि अब्बास चोरीचे इलेक्ट्रीक सामान विकण्यासाठी मालाड मालवणी येथील बगाकडे येणार असल्याची माहिती खोत यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून बगासह खान आणि अब्बासला पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या त्रिकुटाकडून २४ लाख ३९ हजार ९२३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पसार चालकाचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बगा हा गोरेगाव येथे राहण्यास असून चोरीचे सामान खरेदी करण्याचे काम करतो. तर खान मालाड तर पटेल भिवंडी येथील रहिवाशी आहे. अटक आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत असून यातील पसार आरोपी चालकाचाही शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)