जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यामध्ये भारतीय रेल्वेने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेत जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल उभारला होता. हा पूल चिनाब नदीवर असल्याने त्याला चिनाब ब्रिज असं नाव देण्यात आलं होतं. या ब्रिजमुळे रियासी जिल्ह्यातील स्थानिकांच्या दळणवळणाची मोठी सोय झाली आहे. त्याबरोबरच हा ब्रिज देशासाठी आर्थिक आणि संरक्षणात्मकही महत्त्वाचा आहे. दरम्यान, या चिनाब ब्रिजबाबत गुप्तचर विभागाकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचीनसोबत मिळून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती गोळा करत आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयकडून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती मिळवली जात आहे. यासाठी आयएसआय चीनची गुप्तचर यंत्रणा एमएसएससोबत मिळून काम करत आहे. पाकिस्तानने चीनसोबत मिळून जम्मू आणि काश्मीरमधील प्रकल्प आणि त्यांच्याशी संबंधित माहिती गोळा करणं भारतासाठी चिंतेची बाब आहे. याबाबत भारताच्या गुप्तचर यंत्रणांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही शेजाऱ्यांची नजर भारताच्या चिब रेल्वे ब्रिज प्रकल्पावर आहे.
गुप्तचर विभागाकडून सांगण्यात आलं ही, इतर महत्त्वाच्या प्रकल्पांबरोबरच दहशतवाद्यांची नजर ही जगातील सर्वात उंच अशा चिनाब ब्रिजवरही आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबत एक इशाराही देण्यात आला आहे. रियासीला रामबनशी जोडणाऱ्या चिनाब ब्रिजबाबतची महत्त्वाची माहिती पाकिस्तान आणि चीनच्या गुप्तचर यंत्रणांनी गोळा केली आहे, असे या अलर्टमध्ये म्हटले आहे.
गातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज म्हणून गणना होत असलेल्या चिनाब ब्रिजवरून यावर्षी २० जून रोजी आठ डब्यांच्या मेमू ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. हा ब्रिज सुरक्षेबरोबरच दळणवळणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण या ब्रिजमुळे काश्मीर हा भारताच्या जवळपास प्रत्येक राज्याशी जोडला गेला आहे.