बंगळुरू : जनता दलाचे(एस) विधिमंडळ नेते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी विधान परिषदेसाठी इच्छुक उमेदवाराला पक्षाचे समर्थन देण्यासाठी 40 कोटी रुपये मागितल्याचा गौप्यस्फोट एका टेपद्वारे करण्यात आल्यामुळे राजकीय वतरुळात खळबळ उडाली आहे.
ध्वनीफीतीत कुमारस्वामी आणि विधानपरिषदेसाठी अपक्ष निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नेते बिजापूरचे विजयगौडा पाटील यांच्या निकटवर्तीय समर्थकात झालेला संवाद असून, शनिवारी रात्री उशिरा जारी करण्यात आलेली ही ध्वनीफीत टीव्ही वाहिन्यांनी ब्रेकिंग न्यूज म्हणून झळकवली. स्वत: कुमारस्वामी यांनी लाच मागितल्याच्या आरोपांचा इन्कार केलेला नाही.
जनजा दलाने (एस) विजयगौडा पाटील यांना न देता बंगळुरू येथे प्रॉपर्टी डिलर डी.यू. मल्किाजरुना यांना उमेदवारी बहाल केली. कुमारस्वामी हे विजयगौडा समर्थकाला म्हणतात की, माङो आमदार माङया नियंत्रणात नाहीत. त्यांनी याआधीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत बोलणी चालविली आहे. पैशासाठी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ केला आहे. तुम्ही पैसे द्या, मी बाकीची काळजी घेईन.
विजयगौडा यांचा समर्थक त्यावर म्हणतो, कृपया रक्कम 1क् कोटी करा. तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला आमच्या स्वामींचे (कथित संताचा नामोल्लेख नाही) समर्थन लाभेल. कुमारस्वामी उत्तरले की, प्रत्येक आमदार 1 कोटी मागत आहे. आमच्या पक्षाचे 4क् आमदार आहेत. मी काय करू? त्यांनीही निवडणुका जिंकण्यासाठी पैसे उसने घेतले आहेत. जूनच्या प्रारंभी पक्षाच्या बैठकीच्यावेळी हे संभाषण झालेले आहे. (वृत्तसंस्था)
हे तर सध्याच्या राजकारणाचे कटू सत्य..
सध्याच्या राजकारणातील हे कटू सत्य आहे. तोंडावर एक बोलायचे आणि मागे वेगळे करायचे अशा नेत्यांमध्ये मी नाही. मला व्हीलन म्हणून समोर आणणो योग्य नाही. मी काही महा अपराध केलेला नाही. या निवडणुकीत अन्य पक्षांनीही तेच केले आहे. विधानसभेत आणि बाहेर या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची माझी तयारी आहे, या शब्दांत कुमारस्वामींनी कबुली दिली आहे.
काय आहे संभाषणात..
च्आमदारांनी कर्ज काढून निवडणुकीवर पैसा लावला. आता व्याज देत आहे.
च्4क् आमदार आहेत प्रत्येकाची एक कोटीची मागणी आहे.
च्माङो आमदार नियंत्रणात नाहीत. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी बोलणी चालवली आहे.
च्पैसे देऊनच निवडणुका जिंकल्या जातात.