सुमेध बनसोड नवी दिल्ली: आंदोलनस्थळी केवळ गिरीश महाजन कागद घेऊन येतात. केंद्र सरकारकडून ठोस आश्वासने नाहीत. निव्वळ धूळफेक चालली आहे. मोदी सरकार शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हिताचे नाही. आता मोदी सरकारचीही घरी जाण्याची वेळ आली असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केली.उपोषणाच्या सहाव्या दिवशी अण्णांचे वजन तब्बल साडे पाच किलोने घटले आहे. त्यांना भरपूर पाणी पिण्याचा तसेच आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला. जवळपास १५ आंदोलकांची गेल्या काही दिवसांमध्ये प्रकृती ढासळली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रामलीला मैदानावर गर्दीचा जोर जरी ओसरला असला तरी आंदोलकांमध्ये जोश अद्यापही कायम आहे. गुरुवारी जवळपासच्या राज्यातील १० हजार शेतकरी इथे दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला.महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांशी चर्चा केली. पण चर्चेतून तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांशी १५ मिनिट फोनवरू न चर्चा केली. अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या असल्या तरी लोकपालविषयी सरकारकडून खूप वेळ घेतला जात आहे, कार्यकर्त्यांनी केली आहे.
गर्दी ओसरली, जोश कायम; अण्णांचे वजन ५ किलोंनी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 3:49 AM