शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

लसीकरणासाठी ज्येष्ठांची गर्दी; पंतप्रधान म्हणाले, लस घ्या अन् देशाला कोरोनापासून मुक्त करा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 6:46 AM

दुसऱ्या टप्प्यात २७ कोटी लोकांना दिला जाणार डाेस.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना लसीकरणाच्या सोमवारी सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबरच देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त अशा लाखो लोकांनी विविध रुग्णालये व केंद्रात जाऊन लस घेतली. बड्या नेत्यांनी लस घ्यायला सुरुवात केल्याने आता लसीकरणाची गती वाढेल, अशी खात्री वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केली.

ही लस घेतल्याने आपणास कोरोनाची लागण होणार नाही, हा विश्वास असल्याने लोकांनी गर्दी केली होती. काही जण नोंदणी न करताच केंद्रांवर पोहोचले, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणास विलंब लागला. मात्र या अडचणी बहुतांश ठिकाणी दूर झाल्या.गमछा आसामचा, नर्स केरळ, पुदुच्चेरीच्यालस घेण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांच्या गळ्यात आसामचा गमछा होता. लस देणाऱ्या पी. निवेदा या पुदुच्चेरीच्या असून, त्यांना मदत करणारी रोसम्मा अनिल केरळची आहे. केरळ, आसाम, पुदुच्चेरीमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत, हे विशेष!

कोणती लस घेतली?पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. ही लस आवर्जून घ्यावी, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  मूळच्या पुदुच्चेरीच्या परिचारिका पी. निवेदा यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस पंतप्रधानांना दिला.

    राजकारण्यांसाठी जाड सुई?n पंतप्रधानांना लसीचा डोस नर्स पी. निवेदा यांनी टोचला. ती होताच मोदींनी विचारले : लस टोचून झाली? मला कळलेच नाही. n राजकारण्यांची कातडी जाड असल्याने त्यांना लस टोचण्यासाठी खास जाड सुई असते का, असा विनोदही त्यांनी केला.त्या दोघी आनंदी : निवेदा व रोसम्मा अनिल यांनी सांगितले की, पंतप्रधान लस घेण्यासाठी येणार आहेत, याची आम्हाला कल्पना नव्हती. पंतप्रधानांना लस देता आली, याचा आम्हाला आनंद आहे.

संभ्रम दूर होईल : पंतप्रधानांनी लस घेतल्याचे पाहून लोकांचा आत्मविश्वास वाढेल, संभ्रम दूर होईल आणि तेही लेस घेतील, असे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.बिहारमध्ये सर्वांना मोफत : पाटण्यात लस घेतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संपूर्ण बिहारमध्ये प्रत्येकाला मोफत लस दिली जाईल, खासगी रुग्णालयांतही रक्कम आकारली जाणार नाही, अशी घोषणा केली. 

१.११कोटी कोरोनाबाधित देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ११ लाखांपेक्षा अधिक झाली असून त्यातील १ कोटी ७ लाख ८६ हजार जण बरे झाले आहेत. सोमवारी कोरोनाचे साडेपंधरा हजार नवे रुग्ण आढळले असून सलग पाचव्या दिवशी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली.

कोरोनाविरोधातील युद्धात भारताचे योगदान महत्त्वाचे आहे. अगदी कमी वेळात भारताने या लसी विकसित केल्या. सर्वांनी लस घेऊन या आजारापासून देशाला मुक्त करावे.     - नरेंद्र मोदी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी