जगाच्या पाठीवर अनेक प्रथा, परंपरा आहेत आणि त्या आजही पाळल्या जातात. आयर्लंडमधील प्रथेनुसार या बोकडाला चक्क राजाचा मुकुट घातला जातो. तर, एका १२ वर्षांच्या मुलीला राणी केले जाते. किलॉरग्लिन या शहरात दरवर्षी ‘पक मेळा’भरतो. त्यानुसार डोंगरी भागातील बोकडाला शहराचे सर्वाधिकार दिले जातात. यामागील लोककथा अशी आहे की, १७ व्या शतकात जेव्हा आॅलिवर क्रॉमवेल नावाचा राजाआपल्या सैन्यासह या भागावर हल्ला करण्यासाठी पुढे येत होता तेव्हा एका बोकडाने लोकांना सावध केले.तेव्हापासून जनावरांच्या सन्मानार्थ येथे मेळा भरतो. शालेय विद्यार्थीनीला राणी म्हणून निवडले जाते. यावर्षी ज्या मुलीची निवड झाली तिचे नाव आहे कॅटलिन. तीन दिवस चालणाºया या उत्सवात नाचगाणे आणि पशुमेळा भरतो.दरवर्षी १० ते १२ आॅगस्ट या काळात हा उत्सव होतो.