शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

अरे बिल आहे की थट्टा?; बटालियन कॅम्पच्या बिलाचा आकडा पाहून जवानांना शॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 11:13 AM

काश्मीरमधील सीआरपीएफ बटालियनच्या तळाला भरमसाठ बिल

श्रीनगर: लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरसमाठ बिलांमुळे सर्वसामान्यांना मोठा शॉक बसला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीदेखील वीज कंपन्यांनी मोठ्या रकमेची बिलं पाठवली. वीज कंपन्यांच्या या मनमानी कारभारामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. आता तर जवानांच्या बटालियनालादेखील वीज कंपन्यांनी शॉक दिला आहे. काश्मीर खोऱ्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बटालियन कॅम्पला तब्बल दीड कोटींचं बिल आलं आहे.चरारे-शेरिफमध्ये असलेल्या सीआरपीएफच्या १८१ बटालियनला ऊर्जा विकास विभागानं (पीडीडी) दीड कोटी रुपयांचं बिल पाठवलं आहे. या बिलावर १८१ बटालियन, सीआरपीएफ असा उल्लेख आहे. जम्मू-काश्मीरच पोलीस दलाकडून सीआरपीएफचं बिल भरण्यात येतं. मात्र भरमसाठ बिल पाठवण्यात आल्यानं सीआरपीएफच्या तळावरील अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.'बहुधा बिलात एखादी चूक झाली असावी. आम्ही याबद्दल पीडीडीला संपर्क केला. पण शनिवार, रविवारी असल्यानं त्यांना सुट्टी होती,' अशी माहिती सीआरपीएफचे एडीजी झुल्फीकार हुसेन यांनी दिली. सीआरपीफला पाठवण्यात आलेल्या बिलावर १० ऑगस्ट तारीख आहे. २७ ऑगस्टपर्यंत बिल भरण्याची अंतिम तारीख आहे. तोपर्यंत पीडीडी झालेला घोळ सोडवेल, अशी अपेक्षा हुसेन यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :electricityवीज