ठळक मुद्देही घटना सीआरपीएफ जवानांबद्दलचा अभिमान वाढवणारी आहे. बिजापूर येथील रुग्णालयापर्यंत ५ किलोमीटरच्या अंतरावर खांद्यावर खाटेवरून उपचारासाठी नेले.
छत्तीसगड - छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात एक कौतुकास्पद घटना घडली आहे. ही घटना सीआरपीएफ जवानांबद्दलचा अभिमान वाढवणारी आहे. छत्तीसगडमधील सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनच्या जवानांनी ट्रॅक्टरमधून पडून जखमी झालेल्या व्यक्तीला बिजापूर येथील रुग्णालयापर्यंत ५ किलोमीटरच्या अंतरावर खांद्यावर खाटेवरून उपचारासाठी नेले. या जवानांनी केलेल्या कौतुकास्पद कार्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून जवानांचे कौतुक होत आहे. बिजापूरमधील अती दुर्गम भागात एका जखमी व्यक्तीला उपचाराची गरज होती. त्यावेळी खांद्यावर खाटेवर जखमी व्यक्तीला घेऊन सीआरपीएफच्या जवानांनी तब्बल किलोमीटर अंतर पार केले आहे. सध्या जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.