बस्तर - छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील माओवाद प्रभावित क्षेत्रात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या एका जवानाने आपल्याच सह-यांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला असून एक जवान जखमी झाला आहे. सीआरपीएफच्या 168 बटालियनमधले हे जवान होते. बिजापूरमधील बासागुडा येथे शनिवारी संध्याकाळी 5.15 च्या सुमारास ही घटना घडली.
बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी ही माहिती दिली. सहका-यांबरोबर झालेल्या शाब्दीक बाचाबाचीतून संतापलेल्या जवानाने हे कृत्य केले. मृत जवानांची ओळख पटली असून व्ही.के.शर्मा, मेघ सिंह राजवीर सिंह आणि जी.के.राव अशी मृत जवानांची नाव आहेत. कॉन्स्टेबल गजानंद नावाचा जवान जखमी झाला आहे. त्याल जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
सानत कुमार असे आरोपी जवानाचे नाव आहे. सहका-यांबरोबर वाद झाल्यानंतर सानत कुमारने त्याच्या जवळच्या एक-47 रायफलमधून अंदाधुंद गोळीबार केला. आरोपी सानत कुमारला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. कुठल्या परिस्थिती सानत कुमारने हे पाऊल उचलेल, इतके टोकाचे पाऊल उचलण्यासाठी काय कारण घडले त्याची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश सीआरपीएफने दिले आहेत.