ऑनलाइन लोकमत
जम्मू काश्मीर, दि. 11 - शोपिअन जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या गस्त पथकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवानासह चार लोक जखमी झाले आहेत. बोन बाजार परिसरात सीआरपीएफ जवान उभे असताना संशयित दहशतवाद्यांनी ग्रेनेड जवानांच्या दिशेने टाकला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. स्फोटानंतर बाजारात काही लोकांची हालचालही पाहिल्याचं सांगण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दुसरीकडे पम्पोरमध्ये गेल्या 24 तासांपासून दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरु आहे. दहशतवादी ईडीआय (EDI)च्या शासकीय इमारतीत लपून बसले असून तेथून वारंवार गोळीबार करत आहे. इमारतीत २-३ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी इमारतील घेरले असून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.
Two CRPF jawans and four civilians injured in a grenade attack in Shopian district of Jammu and Kashmir. pic.twitter.com/oPcmxiJMxs— ANI (@ANI_news) October 11, 2016