नवी दिल्ली : हैदराबादेत गेल्या आठवड्यात पशुवैद्यक तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यसभा व लोकसभेत सोमवारी उमटले, तर हैदराबादेतील त्या दुर्दैवी प्रकाराचा निषेध सोमवारी येथे शेकडो लोकांनी जंतरमंतरवर एकत्र येऊन केला.पशुवैद्यक तरुणीवरील बलात्कार व नंतर झालेली हत्या तसेच देशात इतरत्र बलात्कार व हत्या प्रकरणांवर राज्यसभेत सोमवारी खासदारांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. बलात्कार करणाऱ्यांना देहदंडाची शिक्षा, दोषी ठरलेल्यांची जमावाकडून हत्या आणि त्यांचे खच्चीकरण केले पाहिजे अशा मागण्या खासदारांनी संतापून केल्या.राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू हैदराबादेत बलात्कार आणि हत्येच्या मुद्यावर कामकाज तहकूब करण्याची मागणी फेटाळली; पण त्यांंनी हा विषय आणि देशात अशाच घडलेल्या घटनांचा थोडक्यात उल्लेख करण्यास परवानगी दिली.राज्यसभेतील समाजवादी पक्षाच्या सदस्य जया बच्चन यांनी बलात्काºयांना ठेचून मारले पाहिजे, अशी वादग्रस्त सूचना केली. सरकारने आता निश्चित असे उत्तर दिले पाहिजे, असे लोकांना हवे आहे, असे म्हटले. बलात्कारातील आरोपींनालोकांमध्ये आणून ठेचून मारलेपाहिजे, असे बच्चन म्हणाल्या. द्रमुकचे सदस्य पी. विल्सन यांनी दोषी बलात्काºयांचे खच्चीकरण (कास्ट्रेशन) करण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे, अशी सूचना केली. लोकसभेत काँग्रेसचे सदस्य नलगोंडा रेड्डी म्हणाले की, दारूच्या वाटेल तशा विक्रीमुळे अशा भीषण व घृणास्पद घटना घडतात.कठोर तरतुदी करू -राजनाथसिंह सोमवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच सभापती ओम बिर्ला म्हणाले की, ‘गंभीर विषय’ शून्य कालावधीत उपस्थित करण्यास मी परवानगी देईन.संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, महिलांवरील अत्याचारांच्या विषयावर सरकार लोकसभेत चर्चा करण्यास तयार आहे आणि हैदराबादेत घडली तशा घटनांना रोखण्यासाठी कायद्यांत कठोर तरतुदी शोधण्याची त्याची तयारी आहे.दरम्यान, निर्भयाच्या आईने न्यायासाठी अंतहीन प्रतीक्षा करावी लागत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, पशुवैद्यक तरुणीच्या कुटुंबियांना तरी लवकरात लवकर आरोपींना शिक्षा झाल्याचे बघायला मिळावे अशी आशाआहे.देशात महिला कधी सुरक्षित राहणार?४०-५० निदर्शकांनी काळ्या फिती बांधल्या होत्या व त्यांच्या हातात ‘आम्हाला न्याय द्या’ आणि ‘बलात्काºयांना फाशी द्या’, अशा घोषणा लिहिलेले फलक होते. सरकारी रुग्णालयात ही पशुवैद्यक तरुणी कामाला होती.तिच्यावर ट्रकवर काम करणाºया चार जणांनी गावाबाहेर बलात्कार करून तिला मारून टाकले. गुरुवारी तिचा जळालेला मृतदेह हैदराबादच्या शादनगरजवळ रस्त्याखालच्या नाल्यात आढळला.या निदर्शने आयोजित केलेली अमृता धवन म्हणाली की, मी या समाजाची सदस्य असून, आमच्या देशात जे काही घडत आहे त्याबद्दल मला काळजी वाटते. आमच्या महिला या असुरक्षित आहेत हे सांगण्यासाठी आम्हाला दुसºया निर्भयाची का गरज होती? न्यायव्यवस्थेने वेगाने न्याय दिला पाहिजे.
बलात्काऱ्यांना ठेचून मारा, खच्चीकरण करा; राज्यसभेत संतप्त सदस्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 1:49 AM