नवी दिल्ली: कोरोनामुळे आतापर्यत जगभरातील आतापर्यंत 1,54,247 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2,250,432 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत चालली आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनावर मात करण्यासाठी लस शोधण्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन केले होते. नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी देशातील अनेक शास्त्रज्ञ पुढे सरसावले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी लवकरच लस तयार केली जाईल असा विश्वास भारतीय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदचे संचालक डॉ. शेखर मंडे म्हणाले की, आम्ही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)ची परवानगी घेऊन कोरोनासाठी कुष्ठरोगाच्या उपचारातील प्रभावी लसची चाचणी सुरू केली आहे. तसेच आम्ही जीनोम अनुक्रमांकडे लक्ष देत आहे. जीनोम अनुक्रमांद्वारे जर एखाद्यामध्ये विषाणू आला असेल तर तो कोणाद्वारे आणि कसा आला याची माहिती मिळेत असं शेखर मंडे यांनी सांगितले.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनासारख्या महामारीच्या उपचारासाठी अजूनही अधिकृत लसीचा शोध लागलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही आपली लस तयार करण्यास किमान एक वर्ष लागणार असल्याचे म्हटले आहे. चीन, अमेरिका आणि भारत यासह 50 देशांमध्ये, शास्त्रज्ञ आज कोरोना लस तयार करण्यासाठी काम करत आहेत.
कोरोनावरील उपचारांसाठी कोणतीही लस दिली गेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही आपली लस तयार करण्यास किमान एक वर्ष लागणार असल्याचे म्हटले आहे. चीन, अमेरिका आणि भारत यासह 50 देशांमध्ये, शास्त्रज्ञ आज कोरोना लस तयार करण्यासाठी काम करत आहेत.