शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

Farmers Protest : "शेतकरी आंदोलन उच्च दर्जाचे दलाल चालवित आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 12:47 PM

usha thakur : खोटा कट रचणे फार काळ टिकणार नाही, असे उषा ठाकूर यांनी सांगितले. 

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे.

इंदूर : भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि केंद्र सरकारवर कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सर्व स्तरावरून निशाणा साधला जात आहे. त्यामुळे मध्य प्रदेशच्या पर्यटन-संस्कृती आणि अध्यात्म विभागातील मंत्री उषा ठाकूर या आपल्या पार्टीचा आणि केंद्र सरकारचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये उच्च दर्जाचे दलाल नियोजित पद्धतीने शेतकरी आंदोलन चालवित आहेत. डाव्या विचारसरणीचे लोक आणि तुकडे-तुकडे गँग यामध्ये सामील झाली असून शेतकर्‍यांच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये गँग कधीही यशस्वी होणार नाही. खोटा कट रचणे फार काळ टिकणार नाही, असे उषा ठाकूर यांनी सांगितले. 

याचबरोबर, कृषी कायद्यातील भ्रम दूर करण्यासाठी भाजपा जनजागृती मोहीम राबवित आहे. कृषी विधेयकाबाबत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला माहिती देणे ही आपली जबाबदारी आहे. भाजपाने आता शेतकऱ्यांचा भ्रम दूर करण्यासाठी एक मेगा प्लॅन तयार केला आहे, असे उषा ठाकूर म्हणाल्या. तसेच, भाजपाचे मोठे नेते शेतकर्‍यांना कृषी कायद्याची माहिती आणि त्याचे फायदे सांगतील. शेतकऱ्यांना सांगितले जाईल की, भाजपा सरकारची सर्वोच्च प्राथमिकता ही गावे, गरीब आणि शेतकरी आहेत. केंद्र सरकारने आणलेले नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना अधिकाधिक संधी आणि पर्याय उपलब्ध करून देणार आहेत, असे उषा ठाकूर यांनी सांगितले.

भाजपाच्या या अभियानांतर्गत १६ डिसेंबर इंदूरच्या दसरा मैदानावर विभागीय शेतकरी परिषद होणार आहे. यात इंदूर विभागातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या तयारीसाठी विधानसभेनुसार बैठका घेण्यात आल्या आहेत. या परिषदेची व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य संघटनेने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार नंदकुमारसिंग चौहान, आमदार रमेश मेंदोला आणि प्रदेश सरचिटणीस कविता पाटीदार यांची नियुक्ती केली आहे. किसान संमेलनाला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय आणि राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा संबोधित करतील, असेही उषा ठाकूर यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत आतापर्यंत सरकार आणि शेतकरी यांच्यात झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाFarmerशेतकरी