शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

काश्मीरमध्ये संचारबंदीसदृश परिस्थिती

By admin | Published: May 29, 2017 1:30 AM

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद भट्ट लष्करी कारवाईत ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक

श्रीनगर : हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद भट्ट लष्करी कारवाईत ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आले असून, संपूर्ण खोऱ्यात संचारबंदीसदृश परिस्थिती आहे. श्रीनगर तसेच पुलवामा, शोपिया, अनंतनाग जिल्ह्यांमध्ये कडक बंदोबस्त आहे, तर बडगाम आणि कुलगाममध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे.वाढता तणाव आणि कायदा व सुव्यवस्थेला असलेला धोका लक्षात घेऊ न संपूर्ण खोऱ्यात निमलष्करी दलाच्या तुकड्या वाढवण्यात आल्या आहेत. शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली असून, जिथे परीक्षा आहे, तेथील विद्यार्थ्यांनाच केवळ ओळखपत्राच्या आधारे संचारबंदी असलेल्या क्षेत्रातून जाण्याची सवलत देण्यात आली आहे. इंटरनेट सेवा बंदच असून, प्रीपेड क्रमांकावर फोन करण्याची सेवाही बंद झाली आहे.जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट आणि हुरियत कॉन्फरन्सने दोन दिवस बंदचे आवाहन केले असतानाच जेकेएलएफचा प्रमुख यासीन मलिक याला रविवारी अटक करण्यात आली. हुरियतच्या नेत्यांनाही अटक केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सबजार भट्टचा दफनविधी आज त्रालमध्ये पार पडला, तेव्हा हजारो लोक जमले होते. त्यावेळी तिथे तणाव होता; पण अनुचित घटना मात्र घडली नाही. मात्र, तो मारला गेल्यानंतर झालेली दगडफेक आणि हिंसक जमावाला पांगवण्यासाठी केलेला लाठीमार यात किमान ३0 जण जखमी झाले आहेत. सीमा भागात पाकिस्तानातून घुसखोरीचे सत्र चालूच असून, रविवारी सैन्याने केलेल्या कारवाईत आणखी एक दहशतवादी ठार झाला. रविवारी पहाटे ही घटना घडली. सशस्त्र दले आणि दहशतवादी यांच्यात सुरू असलेल्या गोळीबारात लष्करासाठी काम करणारा एक हमालही मरण पावला आहे. गेल्या दोन दिवसांत सैन्याकडून दहशतवादाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत ११ दहशतवादी ठार झाले आहेत. बर्फ वितळू लागल्याने आणि रमजानचा महिना सुरू झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरविण्यासाठी दहशतवाद्यांकडून घुसखोरी केली जात आहे. (वृत्तसंस्था)राज्यपाल राजवट लागू करा : अब्दुल्लाजम्मू-काश्मीरमधील चिघळलेली परिस्थिती लक्षात घेता, राज्यात राज्यपाल राजवट लागू करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख खासदार फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे. काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच, भाजपचे काही नेते धार्मिक विद्वेष पसरविणारी वक्तव्ये करीत असून, पंतप्रधानांनी त्यांना आवर घालावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. एनआयए चौकशीतहरिक- ए- हुरियत या राष्ट्रविरोधी व फुटीरवादी संघटनेला मिळणाऱ्या आर्थिक साह्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एआयए) संघटनेचे नेते फारुख अहमद दार आणि जावेद अहमद बाबा यांना बँक आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांसह चौकशीसाठी बोलावून घेतले आहे.अनेक नेते स्थानबद्धकाश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर काही फुटीरवादी नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.दगडफेक थांबल्याशिवाय संवाद नाही - अमित शहानवी दिल्ली : काश्मीरमधील दगडफेकीचे सत्र जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत तेथील कोणाशीही बोलणी करण्याची शक्यता भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी फेटाळून लावली. मात्र हिंसाचार थांबल्यावर सरकार सर्वांशी संवाद साधेल, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.अमित शहा असेही म्हणाले की, सहा महिन्यांचा एखादा कालखंड विचारात घेऊन काश्मीरच्या परिस्थितीचे खरे आकलन केले जाऊ शकत नाही. त्यासाठी १९८९ ते मे २०१७ असा संपूर्ण कालखंड विचारात घ्यावा लागेल. याआधी काश्मीरमधील परिस्थिती बिघडल्याचे सहा महिने, नऊ महिने किंवा एक वर्षाचे अनेक कालखंड होऊन गेले. पण त्या प्रत्येक वेळी सुरक्षा दलांनी परिस्थिती आटोक्यात आणली होती.पूर्वीच्या रालोआ सरकारने फुटिरतावादी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी बोलणी केली होती, तसे आताचे सरकारही करेल का, असे विचारता शहा म्हणाले की, हिंसाचार थांबून चर्चेसाठी पोषक वातावरण तयार झाले की सर्वांशी बोलणी केली जातील.काश्मीरमध्ये सरकार स्थापनेपूर्वी पीडीपी व भाजपा यांनी आघाडीचा जो अजेंडा ठरविला त्यात राज्यातील सर्व संबंधितांशी बोलणी करण्याचा समावेश आहे, याचे स्मरण दिल्यावर शहा म्हणाले की, हिंसाचार थांबल्यावर बोलणी केली जातील, असेच आम्ही ठरविले होते. दगडफेक सुरू असताना बोलणी होऊ शकत नाहीत. दगड मारणाऱ्यांना आम्ही फुले देऊ शकत नाही, हे त्यांनी समजायला हवे.