सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराची उत्सुकता शिगेला
By admin | Published: March 23, 2017 5:16 PM
यंदा पहिल्यांदाच ऑडिशन : सहा झोनमधून निवडले जाणार दोन विजेते
यंदा पहिल्यांदाच ऑडिशन : सहा झोनमधून निवडले जाणार दोन विजेतेनागपूर : सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण समारंभाबाबत रसिकांमध्ये असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याला कारणही तसेच आहे. या पुरस्काराचा आतापर्यंतचा प्रवास ऐतिहासिक असाच झाला आहे. ही स्पर्धा संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांना एका मंचावर आणत असल्याने या स्पर्धेचे कलावंत व रसिकांनाही एक वेगळेच आकर्षण आहे. या पुरस्काराचे यंदाचे हे चौथे वर्ष असून परिवार चाय प्रस्तुत हा शानदार समारंभ शनिवारी २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात पार पडणार आहे. या समारंभात पाप्युलर आणि चित्रपट अशा दोन कॅटेगिरीतून दोन विजेत्यांची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना एक लक्ष रुपये सन्मान निधी, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन ऑडिशन पद्धतीने स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ या सहा झोनमधून स्पर्धकांकडून त्यांचे ऑडिओ आणि व्हिडीओ ६६६.२४१्न८ङ्म३२ल्लं.ङ्म१ॅ या वेबसाईटवर मागविण्यात आले होते. त्यातून झोननिहाय प्रत्येकी दोन अशा १२ स्पर्धकांंना निवडण्यात आले. या १२ जणांच्या रेकॉर्डिंगची चाचणी मुंबईत संगीत क्षेत्रातील मान्यवर परीक्षकांकडून घेण्यात आली व त्यातून अंतिम दोन विजयी उमेदवार निवडण्यात आले. या विजेत्यांना देखण्या व सुरेल समारंभात सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरविले जाईल.चौकट----------१अशी होती झोनची रचनामुंबई झोन - (मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर ), कोकण झोन - (रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग), पश्चिम महाराष्ट्र झोन -(पुणे, अहमदनगर, सातारा,सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर) मराठवाडा झोन - (औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी) खानदेश झोन - (नाशिक, जळगाव,धुळे आणि नंदुरबार) विदर्भ झोन- (नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा)चौकट----------२यापूर्वीच्या पुरस्काराचे मानकरीगायिका - रिवा रूपकुमार राठोड - (२०१४)गायक - अर्शद अली खान - (२०१४)गायिका - पूजा गायतोंडे - (२०१५)तबला वादक - ओजस अढिया - (२०१५)गायिका - अंकिता जोशी - (२०१६)बासरी वादक - आकाश सतीश - (२०१६)