ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - ५०० आणि १ हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे ८६ टक्के चलन बदलले जाणार आहे. कारण ८६ टक्के काळा पैसा ५०० आणि १ हजारच्या नोटांच्या चलनामध्ये होता. हा पैसा दहशतवाद आणि भ्रष्टाचारासाठी वापरला जात होता असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या निर्णयानंतर प्रामाणिकपणे ज्यांनी पैसा कमावलाय ते बँकेत पैसे जमा करतील. त्यामुळे बँकेत जास्त प्रमाणात पैसा जमा होऊन कर्ज अधिक सहजतेने उपलब्ध होईल. ज्याचा व्याजदर कमी होण्यात परिणाम होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.
अरुण जेटली यांच्या पत्रकारपरिषदेतील मुद्दे
- उद्यापासून ५०० आणि २ हजारच्या नोटा बँक आणि पोस्ट ऑफीसमध्ये उपलब्ध होतील. पुढच्या दोन ते तीन आठवडयात परिस्थिती सुरळीत होईल.
- काळया पैशाची समांतर अर्थव्यवस्था सुरु होती. ५०० आणि १ हजारची नोट बंद करण्याच्या निर्णयामुळे हा पैसा व्यवस्थेमध्ये येईल.
- या निर्णयामुळे निवडणुका स्वस्त झाल्या तर एका चांगली सुरुवात असेल.
- नव्या नोटांमध्ये कुठलीही चीप नाही .
- बँकेत नोटा बदलून देण्यासाठी गरजेनुसार अतिरिक्त व्यवस्था केली जाईल.
- आरबीआयकडून बँका आणि पोस्ट ऑफीसमध्ये पुरेस चलन उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अजून दोन ते तीन आठवडयात चलन तुटवडा दूर होईल.
- आर्थिक सुधारणेच्या दृष्टीने हा एक मोठा निर्णय.
- डिपॉझिटस वाढल्यामुळे बँकांची क्षमताही वाढणार आहे, हा निर्णय लोकांच्या पैसा खर्च करण्याच्या आणि साठवण्याच्या पद्धतीवर परिणाम करणारा आहे.
- ५०० आणि एक हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे समाजाने स्वागत केले, भारताची विश्वासहर्ता टिकून रहावी यादृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे, देशाला कॅशलेस अर्थव्यस्थेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे.
- आमचं सरकार सत्तेवर आल्यापासून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले.