नवी दिल्ली : वेळेत घर न देणे, तसेच निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणे, यासाठी बिल्डरने ग्राहकास १0 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत. आयोगाचे चेअरमन डी. के. जैन यांनी हा आदेश दिला. हे प्रकरण केरळातील असून, मरियम कुरियन असे ग्राहक महिलेचे नाव आहे. तिने मनोजकुमार नामक बिल्डरसोबत २00९ मध्ये घर खरेदी करार केला होता. नऊ महिन्यांत घराचा ताबा देण्याचे ठरले होते. ३0,४३,५00 रुपये बिल्डरला देऊनही त्याने वेळेत ताबा दिला नाही. (वृत्तसंस्था)
केरळातील बिल्डरला ग्राहक आयोगाचा दणका
By admin | Published: January 18, 2017 6:45 AM