हैदराबादः हैदराबादेतल्या एका डिलिव्हरी बॉयला धर्मासंदर्भात विचारून एका ग्राहकानं डिलिव्हरी ऑर्डर घेण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर स्विगीनं नाराजी व्यक्त केली आहे. हैदराबादेत स्विगीचा डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्यानं ग्राहकानं त्याच्याकडून जेवण स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्या ग्राहकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक पी. श्रीनिवास म्हणाले, स्विगीचा कर्मचारी मुदस्सीर सुलेमान यानं बुधवारी एक तक्रार दाखल केली.एका ग्राहकानं जेवणाची ऑर्डर केली होती, मी डिलिव्हरी देण्यास गेलो असता त्यानं जात विचारली, तेव्हा मी मुस्लिम असल्याचं समजल्यावर त्यांनी जेवण स्वीकारण्यास नकार दिला, असं त्या मुस्लिम डिलिव्हरी बॉयनं हे प्रकरण मुस्लिम संघटना मजलिस बचाओ तहरिकचे अध्यक्ष अमजद उल्ला खान यांच्याकडे नेलं आहे. त्यांनी ट्विटवरून या प्रकाराला वाचा फोडली. ते लिहितात, चिकन 65ची ऑर्डर दिली होती. हिंदू डिलिव्हरी बॉय पाठवतो. परंतु स्विगीनं डिलिव्हरीचं पार्सल मुस्लिम मुलाच्या हातातून पाठवलं. त्यानंतर ग्राहकानं ऑर्डर घेण्यास नकार दिला. त्यानंतर स्विगीनंही या प्रकरणाचा निषेध नोंदवला. आम्ही प्रत्येक धर्म आणि विचारांचा आदर करतो. कोणाचीही ऑर्डर कोणा व्यक्तीच्या जातीधर्मावर आधारित नसते. एक संघटना म्हणून आम्ही कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये कोणताही भेदभाव करत नाही. प्रत्येक ऑर्डर स्वतंत्ररीत्या डिलिव्हरी केली जाते. ते ऑर्डरच्या लोकशनवर अवलंबून असतं.
मुस्लिम डिलिव्हरी बॉयच्या हातातून जेवण स्वीकारण्यास नकार; स्विगीनं व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 3:57 PM