कांडला (गुजरात) - भारताच्या सीमाशुल्क विभागाने मोठ्या कारस्थानाचा पर्दाफाश केला आहे. सीमाशुल्क विभागाने पाकिस्तानकडे जाणारे एक संशयास्पद जहाज ताब्यात घेतले आहे. या जहाजावर बॅलेस्टिक मिसाईल लॉन्च करण्यासाठी लागणारे सामान सापडले आहे. या जहाजावर हाँगकाँगचा झेंडा लावलेला असून, ते कराची पोर्ट कासिम येथे जात होते. दरम्यान, हे जहाज पकडले गेल्यामुळे पाकिस्तान आणि चीनमध्ये गुप्तपणे अणुप्रसार सुरू असल्याचा संशय बळावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे जहाज ३ फेब्रुवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर हे जहाज अधिक तपासासाठी गुजरातमधील कांडला बंदरात आणण्यात आले होते. तिथे डीआरडीओच्या टीमने या जहाजाची तपासणी केली. तसेच या आठवड्यात अणुशास्त्रज्ञांचे पथक या जहाजाची तपासणी करणार आहे.
भयंकर संकटामुळे पाकिस्तानात आणीबाणी लागू; भारताकडे मागितला मदतीचा हात
हनी ट्रॅप: नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला गोपनिय दस्तावेज पुरविले; 11 अटकेत
पाकिस्तानला धक्का; निजामाचे 325 कोटी भारताच्या तिजोरीत जमा
हे जहाज चीनमधील जियांगसू प्रांतातील बंदरामधून कराची येथील कासिम बंदरात जात होते. दरम्यान, संरक्षणविषयक बाबींमुळे अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. या जहाजाचे नाव दा कुई यून आहे. तिथे हाँगकाँगचा झेंडा लावलेला आहे.